ठाणे : अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उबाठाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ठाण्यात हा पक्ष प्रवेश झाला. तीनही जिल्ह्यांतून झालेल्या पक्षप्रवेशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे.

अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, नेवासाचे उपजिल्हाप्रमुख हरिराम शेळके, नीरज नागरे, पंकज लांभाटे, नितीन जगताप, राहुरीचे डॉ. अजय म्हसे, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, अकोलेचे महेंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, शिर्डी-राहताचे अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहोर तसेच कोपरगावचे मुकूंद सिनकर, सचिन मलिक, अशोक पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने झाला.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील उबाठा गटाचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे, भीमराव भोसले, सुधीर पाटील, महादेव सोमवंशी, प्रवीण देवकर तसेच जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या नेतृत्वाखाली गणेश धायगुडे, विजय थिटे, विजयकुमार देवकाते, डॉ. राहुल शंख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दौंड विधानसभा मतदारसंघातील दत्तात्रय शितोळे, संपत शिंदे, विजय गुंड, माजी जिल्हाप्रमुख ॲड. राजेंद्र काळे, विश्वास मांढरे, निलेश मदने, शहाजी दळवी, परेश भापकर यांनीही आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

नांदेड जिल्ह्यातील मुखेडचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, विजयकुमार पाटील सुगावकर, संजय रावणगावकर, गणपत पाटील मंडलापूरकर, किरण पाटील धामणगावकर या पंचायत समिती सदस्यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सर्व नवागतांचे स्वागत करत, शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेत येत आहेत. जनतेचा विश्वास आणि विकासाची भूमिका हीच आमची खरी ताकद आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.