scorecardresearch

ठाणे महापालिकेच्या खोदकामामुळे कोलशेत भागात विद्युत पुरवठा खंडीत

खोदकामादरम्यान भूमिगत विद्युत वाहिनीला जेसीबीचा धक्का बसला आणि विद्युत वाहिनी तुटल्या.

electricity

ठाणे महापालिकेच्या खोदकामामुळे शुक्रवारी कोलशेत भागात आठ तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्याचा फटका येथील शेकडो नागरिकांना सहन करावा लागला. सकाळी १० वाजता खंडीत झालेला विद्युत पुर‌वठा महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजता सुरळीत केला.

हेही वाचा- कबुतरांना खाद्यपदार्थ टाकल्यास पाचशे रुपये दंड; ठाणे महापालिकेची शहरात फलकबाजी

कोलशेत येथे एव्हरेस्ट परिसर आहे. या परिसरात महापालिकेकडून खोदकाम सुरू होते. या खोदकामादरम्यान भूमिगत विद्युत वाहिनीला जेसीबीचा धक्का बसला आणि विद्युत वाहिनी तुटल्या. त्यामुळे येथील काही इमारतींचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या विद्युत तुटलेल्या विद्युत वाहिनी जोडण्यासाठी सुमारे आठ तास लागले. त्याचा फटका येथील नागरिकांना बसला. अनेकांची कार्यालयीन तसेच महत्त्वाची कामे विद्युत पुरवठा बंद असल्याने खोळंबली होते. सायंकाळी ७ वाजता हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 20:59 IST