कल्याण: कल्याण पश्चिमेतील एका नोकरदाराला स्टेट बँकेच्या नावाने एका भामटयाने बनावट जुळणी (लिंक) पाठवली. त्या जुळणीच्या साहाय्याने भामट्याने नोकरदाराच्या बँक खात्यामधून एक लाख २४ हजार ९९८ रुपये आपल्या बँक खात्यात वर्ग करुन नोकरदाराची फसवणूक केल्याची घटना बुधवारी घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय मुनीलाल वर्मा (५१, रा. मंगेशी पॅरेडाईस, मोहने रोड, कल्याण) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे. संजय यांना त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन जुळणी आली. ऑनलाईन पडताळणी असल्याचे भासवून ही जुळणी स्टेट बँकेने पाठविली आहे अशी व्यवस्था जुळणीत भामट्याने केली होती.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या सेवेत २३ बारवी प्रकल्प ग्रस्त रुजू; पाच तांत्रिक कारणामुळे प्रतीक्षा यादीत

स्टेट बँकेतून कागदपत्र पडताळणीसाठी जुळणी आली आहे म्हणून संजय वर्मा यांनी तात्काळ ती जुळणी उघडली. त्या जुळणीत स्वताचे नाव, बँक खाते क्रमांक व इतर अत्यावश्यक माहिती भरली. ही माहिती संजय यांनी ऑनलाईन प्रणालीतून जमा केली. तात्काळ त्यांना एक गुप्त संकेतांक आला. समोरील भामट्याने संजय यांना संपर्क करुन गुप्त संकेतांक प्राप्त करुन घेतला. स्टेट बँकेतून कर्मचारी बोलतो यावर त्यांनी विश्वास ठेवला. गुप्त संकेतांक मिळताच भामट्याने संजय वर्मा यांच्या बँक खात्यामधून एक लाख २४ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २६० एड्सचे रुग्ण

रक्कम काढल्याचे लुघसंदेश संजय यांना त्यांच्या मोबाईलवर येताच, त्यांना आपण बँकेतून रक्कम काढली नसताना, रक्कम काढली कोणी म्हणून संशय आला. त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन चौकशी केली त्यावेळी त्यांना जुळणी पाठविणारा हा स्टेट बँकेतील कर्मचारी नसून तो भामटा असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याने संजय वर्मा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employee in kalyan fraud of half a lakh name of state bank kalyan news ysh
First published on: 02-12-2022 at 12:41 IST