पावसाळ्यात साथीच्या आजारांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फतत जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथ नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच पूरपरिस्थिती दरम्यान नागरिकांच्या मदतीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक असे औषधांसह सर्पदंशवरील इंजेक्शनही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे विविध उपायोजना राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर साथ नियंत्रण कक्ष आणि तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात तीन तज्ञ डॉक्टरांचे शिघ्र प्रतिसाद पथक कार्यरत असून येथील आरोग्य विभागात साथ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर देखील हा कक्ष कार्यान्वित आहे. तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकिय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक त्या औषधसाठ्यासोबत सर्पदंशवरील इंजेक्शन सुध्दा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हास्तरावर जादा औषधसाठा देखील उपलब्ध करण्यात आला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना प्राथमिक उपचारासाठी औषधे देण्यात आली आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Establishment accompanying control room establishment contagion control room prevention epidemics rainy season amy
First published on: 06-06-2022 at 17:42 IST