Premium

मानवी भावनांचे कॅनव्हाॅसवरील ग्रामीण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन

मानवी भाव-भावना निसर्गाशी समरुप करुन भावनांचे वास्तवदर्शी कंगोरे उलगडणारे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगिरी आर्ट गॅलरीमध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केले आहे.

exhibition of paintings, paintings by rural painters, paintings on human emotion
मानवी भावनांचे कॅनव्हाॅसवरील ग्रामीण चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

कल्याण : मानवी भाव-भावना निसर्गाशी समरुप करुन भावनांचे वास्तवदर्शी कंगोरे उलगडणारे चित्र प्रदर्शन मुंबईतील जहांगिरी आर्ट गॅलरीमध्ये २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केले आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीन चित्रकारांनी ही चित्रे काढली आहेत. अभिनेत्री आणि संस्कृती कला दर्पणच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील फोर्ट भागातील काळा घोडा जवळील हिरजी जहांगिर आर्ट गॅलरीमधील हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नागरिकांसाठी खुले असणार आहे. अभिव्यक्ति ग्रुप आर्टतर्फे आयोजित या प्रदर्शनात उज्जवल पारगावकर, धीरज पाटील, प्रदीप घाडगे या चित्रकारांचा सहभाग आहे. पारगावकर यांनी मृत चित्र निर्मितीला छेद देत चित्र आकाराची सीमारेषा बाजुला सारून अमृत शैलीतून चित्रातून रंगांचा मुक्त अविष्कार चितारला आहे.

हेही वाचा : भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदार मिळेना, बदलापुरात पालिकेकडून निविदेला मुदतवाढ, भटके श्वान वाढले

मानवी मनाचे कंगोरे चित्रातून पाटील यांनी व्यक्त केले आहेत. भक्तिमय अनुभव घाडगे यांनी रंगलेपनाच्या शैलीतून व्यक्त केले आहेत. पारगावकर हे कला शिक्षक आहेत. दिल्ली, गोवा, मुंबई, दादरा नगर हवेली येथील कला प्रदर्शनात यांनी यापूर्वी सहभाग घेतला आहे. चित्रकलेतील उत्तम कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Exhibition of paintings by rural painters on canvas about human emotions at jahangir art gallery mumbai from 25 september to 1 october css

First published on: 22-09-2023 at 16:49 IST
Next Story
ठाणे : गणेशोत्सव मंडळांनी एड्स आजाराबाबत जनप्रबोधन करावे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन