आपण रेल्वे मध्ये लोको पायलट आहोत. आपली रेल्वेत खूप ओळख आहे. असे दाखवून एका तोतया लोको पायलटने कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहत असलेल्या महिलेला रेल्वेत नोकरी लावतो सांगून २१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, एका आरोपीला अटक केली आहे. तोतया लोको पायलटच्या इतर दोन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

उमाशंकर वर्मा असे तोतया लोको पायलट आरोपीचे नाव आहे. तो उत्तराखंडचा मूळ रहिवासी आहे. उमाशंकरने एक्सप्रेस चालवत असल्याची एक दृश्यचित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित केली होती. या दृश्यचित्रफितीच्या माध्यमातून तो लोकांना आपण रेल्वेत लोको पायलट (एक्सप्रेस इंजिन चालविणारा चालक) आहोत असे दाखवित होता. या दृश्यचित्रफितीच्या खाली आपण बेरोजगारांना रेल्वेत नोकरी लावण्याचे काम करतो असे म्हटले होते.

Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही
High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहणारे राजेंद्र जैन यांच्या पत्नीला नोकरीची गरज आहे. ते नियमित वर्तमानपत्र, समाज माध्यमांतील जाहिराती पाहून पत्नीला कोठे काम मिळेल का यासाठी प्रयत्न करत होते. समाज माध्यमांमधील जाहिराती पाहत असताना राजेंद्र जैन यांचा संपर्क ऑनलाईन माध्यमातून तोतया लोको पायलट उमाशंकर याच्याशी झाला. उमाशंकरने आपण रेल्वेत नोकरी लावण्याचे काम करतो असे समाज माध्यमात प्रसारित केले होते. राजेंद्र, उमाशंकर नियमित एकमेकांशी ऑनलाईन माध्यमातून बोलणी करू लागले. यावेळी राजेंद्रने पत्नीला नोकरीची गरज आहे असे उमाशंकर वर्माला सांगितले. वर्माने आपण रेल्वेत लोको पायलट आहोत. आपली चांगली ओळख आहे असे राजेंद्रला सांगितले.

राजेंद्र यांनी उमाशंकर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पत्नीला रेल्वेत नोकरी लावण्यासाठी उमाशंकरच्या सांगण्या प्रमाणे टप्प्याने एकूण २१ लाख ६० हजार रुपये दिले. पैसे पूर्ण भरले की तुम्हाला तात्काळ रेल्वेतील नोकरीचे नियुक्ती पत्र मिळेल असे उमाशंकर राजेंद्रला सांगू लागला. पैसे भरल्यानंतर राजेंद्रने उमाशंकरच्या मागे नियुक्ती पत्रासाठी तगादा लावला. सुरुवातीला त्याने खोटी उत्तरे देऊन वेळकाढूपणा केला. दोन ते तीन महिने उलटूनही उमाशंकर ठरल्याप्रमाणे नियुक्ती पत्र देत नाही. तो नंतर राजेंद्रला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. नियुक्ती पत्र द्यायचे नसेल तर माझे पैसे परत करा, असे राजेंद्र जैन उमाशंकरला सांगू लागले. त्याला उमाशंकरने दाद दिली नाही. त्यानंतर उमाशंकरने राजेंद्रला प्रतिसाद देणे बंद केले. राजेंद्रने आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यावर राजेंद्र यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करुन उमाशंकर शिताफीने मंगळवारी अटक केली. रंजितकुमार रामधनी, रवी सोनी या त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.