विविधतेतून एकता हे भारताचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. भाषा, रीतिरिवाज, पेहेरावाप्रमाणेच येथील खाद्यसंस्कृतीतही कमालीचे वैविध्य असते. त्यामुळे प्रदेशांगणिक येथे निरनिराळ्या पदार्थाची चव चाखायला मिळते. उदा. महाराष्ट्राची झुणका-भाकरी, पंजाबचे पराठे, गुजरातची जिलेबी-फाफडा. आता महानगरी संस्कृतीत निरनिराळ्या प्रांतातील पदार्थ एकाच ठिकाणी मिळण्याची सोय झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गुजरातमध्ये मलाई मावा गोळा मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो. गुजरातची ही खास थंडाई आता डोंबिवलीतही उपलब्ध झाली आहे. गुजरात गोळा एक्स्प्रेस नावानेच उन्हाची काहिली कमी करणारा हा गोळा मिळतो.

बर्फाचा गोळा तसा आपल्याला नवीन नाही. उन्हाळ्याच्या दिवसात किसलेल्या बर्फाच्या गोळ्यावर निरनिराळ्या रंगांची सरबते फवारून खाण्याची पद्धत आपल्याकडे प्रचलित आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना हा बर्फाचा गोळा खूप आवडतो. उन्हाळ्याच्या दिवसात चौपाटीवर बर्फाचा गोळा विकणाऱ्या अनेक गाडय़ा लागलेल्या असतात. आता सर्वत्र आईस्क्रीमची चलती असली तरी या बर्फाच्या गोळ्याचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. बांबूच्या काडीला लावून अथवा सरळ ग्लासात घेऊन चमच्याने हा गोळा खाल्ला जातो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

गुजरातच्या गोळ्याचे वेगळेपण म्हणजे बर्फाच्या चुऱ्यामध्ये मावा मिसळला जातो. त्यामुळे त्याचा स्वाद कैकपटीने वाढतो. चौपाटीवर सुर्र्र आवाज काढून बर्फाचा गोळा खाताना अगदी सहजच ‘भैय्या और सरबत डालो’ असे सांगितले जाते. मात्र डोंबिवली येथील गोळा ‘भैय्या और मावा डालो ना’ असे सांगत खाल्ला जातो. कारण येथे मिळणारा गोळा मलई मावा गोळा म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची रेसिपी साधारण आपल्याकडच्या गोळ्याप्रमाणेच आहे. यंत्राद्वारे बर्फ किसून त्यावर आधी सरबत फवारले जाते. त्यानंतर त्यात ताजा मावा टाकला जातो. विशेष म्हणजे हा मावा दररोज गुजरातहून मागवला जातो. दरदिवशी साधारण चार ते पाच किलो मावा सहज संपत असल्याचे कुणाल जोशी यांनी सांगितले. विशेष म्हणजे आईस फॅक्टरीतून बर्फ आणतानाही हा बर्फ स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा बनवलेला आहे की नाही हे तपासले जाते. त्यामुळे गोळ्याच्या पाण्यामुळे त्रास होईल याची चिंताच नसते. त्यामुळे येथील गोळा अगदी डोळे झाकून खायला हरकत नाही. एका छोटय़ा भांडय़ात दिला जाणारा हा गोळा चमच्याने खाल्ला जातो. काठीवर लिपलेला गोळा गळून जाण्याची भीती असते. भांडय़ात गोळा असल्याने लहान मुलेही अगदी आरामशीरपणे हा गोळा खातात. गुजरात येथे राजभोग नावाचे एक सरबत मिळते. इथे सरबतातील गोळा खाण्याला खवय्ये अधिक पसंती देतात. इथे मिळणारा कच्ची कैरी विथ मावा गोळा खाणे म्हणजे खवय्यांसाठी मोठी पर्वणीच आहे. केसर, ब्ल्यू बेरी, अननस, वेलची, मँगो आदी विविध चवीमध्ये हा मावा गोळा उपलब्ध आहे. कालाखट्टा हा एक नेहमीच चौपाटीवर मिळणारा गोळा आहे. कालाखट्टा हा गोळा खाल्ला की लाल जिभेचा रंग बदलून ती काही काळ काळी-निळी होते. रंगीबेरंगी गोळा तयार होताना छान दिसतो. कधी एकदा हा थंडगार गोळा पोटात ढकलतोय असे आपल्याला होऊन जाते. मलई मावा ड्रायफ्रुट गोळ्यालाही खवय्यांची मागणी अधिक असल्याचे जोशी यांनी सांगितले. त्यामुळे गोळा खाताना त्याचबरोबर सुकामेवाही लहान मुलांच्या पोटात जातो. त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात पौष्टिक पदार्थ जातात. मलाई गोळ्यात टाकण्यासाठी दरमहा पाच ते सहा किलो सुका मेवा लागतो, अशी माहिती जोशी यांनी दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोळ्यावर खराखुरा फळांचा रस टाकला जातो. त्यात कोणतेही कृत्रिम घटक नसतात. त्यामुळे कोणताही अपाय होण्याची सुतराम शक्यता नसते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचे जेवण झाल्यावर अनेक खवय्ये बाहेर फेरफटका मारताना या मलाई गोळ्याचा आस्वाद घेत असतात.

गुजरात गोळा एक्स्प्रेस

कुठे? :मदन ठाकरे चौक, एचडीएफसी बँकेसमोर, सम्राट स्पोर्टशेजारी, फडके रोड, डोंबिवली (पू.)

कधी? : दररोज संध्याकाळी

६.३० ते रात्री ११