ठाणे : शिळफाटा मार्गावर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका रिक्षाची कंटेनरला धडक बसल्याचा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. या धडकेत रिक्षा चालक अशोक कुमार (३२) हे जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिळफाटा येथून पनवेलच्या दिशेने अशोक कुमार हे रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी रिक्षामध्ये कोणीही प्रवासी नव्हते. त्यांची रिक्षा शिळफाटा येथील राॅयल उपहारगृह परिसरात आली असता, रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला त्यांच्या रिक्षाची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाच्या पुढील भागाचा चुराडा झाला. तसेच अशोक कुमार हे गंभीर जखमी अवस्थेत रिक्षात अडकून राहिले. घटनेची माहिती वाहतुक पोलीस आणि शिळ-डायघर पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने अशोक कुमार यांना रिक्षातून बाहेर काढण्यात आले. अशोक कुमार यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. पोलीस पथकांनी यंत्रणेच्या साहाय्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला केली. त्यानंतर येथील वाहतुक सुरळीत झाली.

truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
shilphata road traffic update first day traffic jam dombivli kalyan
Shilphata Traffic : शिळफाटा मार्गावरील पहिला दिवस कसा होता? वाहतूक कोंडी झाली का?
traffic jam three hours morning Mumbra bypass road Oil barrels bursted
शिळफाटा मार्गानंतर मुंब्रा बायपास ठरला नवी डोकेदुखी, तेलाचे बॅरेल फुटल्याने तीन तास झाली होती वाहतूक कोंडी
Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
Traffic jam due to concreting on Aarey Road Mumbai news
आरे मार्गावर काँक्रीटीकरणानंतरही पुन्हा खोदकाम; अनेक ठिकाणी खड्डे खणल्यामुळे वाहतूक कोंडी
Nashik-Gujarat highway Accident
Nashik-Gujarat Highway Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! भाविकांनी भरलेली बस दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू
Story img Loader