ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. सुभद्रा पवार असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्द्ल पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त निपुगे आणि पोलीस शिपाई अमोल फापाळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुभद्रा पवार या मुळच्या अहमदनगरमधील होत्या. सध्या नोकरीच्या निमित्ताने त्या कळवा येथील मनीषा नगर येथे भाड्याने राहत होत्या. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास राहत्या घरातील रूममध्ये लोखंडी पंख्याला गळफास घेऊन पवार यांनी आपले आयुष्य संपवले. आत्महत्येप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त निपुगे आणि पोलीस शिपाई अमोल फापाळे या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Rohit Sharma on Mumbai Indians captaincy
रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत पहिल्यांदाच स्पष्ट विधान; म्हणाला, “संघात नवीन आलेल्यांनी माझे विचार..”
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
Fact check
Fact Check : प्रचारादरम्यान भाजपा नेत्यावर हल्ला? VIDEO होतोय व्हायरल, जाणून घ्या नेमकं खरं काय…
Supreme Court
‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनला दिलासा; पीएमएलए न्यायालयात सुरु असलेल्या कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती