बहिणाबाई, सिंड्रेला, डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यात चुरस
ठाणे जिल्ह्य़ातील पहिला वहिला अंबरनाथ चित्रपट महोत्सव गुरूवारपासून सुरू होत असून सवरेत्कृष्ट चित्रपटासाठी सोपानाची आई बहिणाबाई, सिंड्रेला आणि डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यात चुरस आहे. त्याचप्रमाणे गल्ला, पेस्ट्री आणि अस्तित्त्व या लघुपटांमधून सवरेत्कृष्ट लघुपट निवडला जाणार आहे.
अंबरनाथच्या बिग सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपासून चित्रपट महोत्सवात निवडले गेलेले नऊ चित्रपट दाखविले जाणार आहेत. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, पाश्र्वगायन आदी विभागातील नामांकने जाहीर झाली असून २ नोव्हेंबर रोजी शिवधाम संकुलात होणाऱ्या समारंभात पारितोषिकांचे वितरण होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने त्यात सहभागी चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ अंबरनाथमध्ये येणार असून त्यांच्या स्वागतासाठी अंबरनाथकरांनी जय्यत तयारी केली आहे. ‘अंबर भरारी’ या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेच्या पुढाकाराने भरविण्यात आलेल्या या महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुरूवारी सकाळी अकरा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होत असून पुढील चार दिवस चित्रपटाचे खेळ दाखविले जाणार आहेत.
रसिकांना हे चित्रपट विनामूल्य पाहता येणार असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल, अशी माहिती संयोजकांनी दिली.

चित्रपट विभाग नामांकने
सवरेत्कृष्ट कथा- ते दोन दिवस, ओळख, बाबांची शाळा
सवरेत्कृष्ट पटकथा- पोस्टर बॉईज, रमा माधव, अ-रेनी-डे
संवाद- सोपानाची आई-बहिणाबाई, बाबांची शाळा, ते दोन दिवस.
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- गजेंद्र अहिरे (नीळकंठ मास्तर), राजेंद्र तलक (अ-रेनी डे), अभिजीत पानसे ( रेगे)
सवरेत्कृष्ट गीतकार- किशोर कदम (अ-रेनी डे), देवेंद्र दोडके (ते दोन दिवस), जनमेजय पाटील (सामर्थ)
सवरेत्कृष्ट संगीतकार- अशोक पत्की ( अ-रेनी डे), आनंद मोडक (रमा माधव) अजय-अतुल (नीळकंठ मास्तर)
याशिवाय पाश्र्वगायक, गायिका, छायाचित्रण, संकलन, सहाय्यक अभिनेता, अभिनेत्री, खलनायक आदींसाठीही पारितोषिके दिली जाणार आहेत.

लघुपट विभागातील नामांकने
सवरेत्कृष्ट आशय- अ‍ॅप्रीशिएट, अस्तित्व, हेल्पिंग हॅन्डस्
सवरेत्कृष्ट संकलक- तपन घोष (मिलियन डॉलर क्लब), मनोज वेलकर (पेस्ट्री), सचिन मारके (गल्ला)
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- नंदू आचरेकर (मिलियन डॉलर क्लब), नीलेश डोंगरे (गल्ला), अभिजीत पुजारी (पेस्ट्री)