ठाणे : करोना काळात उत्पन्न वसुलीवर परिणाम झाल्याने पालिकेवर चार हजार कोटींच्या आसपास दायित्व झालेले होते. मात्र, करोना काळानंतर पालिकेच्या उत्पन्न वसुलीत वाढ होऊ लागल्याने दायित्वाचा भार कमी होऊ लागला असून तो आता २८०० कोटी रुपयांवर आला आहे. उत्पन्न वसुलीचे पैसे दायित्वाच्या भारावरच खर्च होऊ लागल्याने पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटींच्या आसपासच रक्कम शिल्लक असून यामुळे गेल्यावर्षातील पाचशे ते सहाशे कोटींची ठेकेदारांची देयके कशी द्यायची असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे. यामुळे उत्पन्न वसुलीत चांगली वाढ होऊनही दायित्वाच्या भारामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती खडतरच असल्याची बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिकेचे २०२२-२३ या वर्षाचा ३३८४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रशासनाने तयार केला होता. यामध्ये विविध विभागांना कर वसुलीचे उदीष्ट ठरवून देण्यात आले असून त्याप्रमाणे विविध विभागांनी उदीष्ट पुर्ण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यात पालिकेच्या तिजोरीत विविध करापोटी ७४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. राज्य शासनाकडून वस्तु व सेवा कर आणि मुद्रांक शुल्कापोटी ५०२ कोटी रुपये मिळालेले आहेत. तर, त्याचबरोबर शहर सुशोभिकरण, रस्ते तसेच काही प्रकल्पांसाठी ३७० कोटी रुपयांचे अनुदान पालिकेला राज्य शासनाकडून मिळालेले आहे. त्यातून शहराच्या विकासाची कामे सुरु आहेत. एकीकडे पालिकेच्या उत्पन्न वसुली वाढ झालेली दिसत असली तरी हे पैसे दायित्वाच्या भारावर खर्च होत आहेत.

हेही वाचा : टिटवाळा ते कल्याण-नगर महामार्ग गोवेली येथे वर्तुळकार रस्त्याने जोडणार ; एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय

करोना काळात पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने पालिकेवर ४००० कोटी रुपयांचे दायित्व झाले होते. पालिकेला ठेकेदारांची देयके देणे शक्य होत नव्हती. पालिकेचा आर्थिक गाडा रु‌ळावरून घसरला होता. परंतु करोना काळानंतर पालिकेच्या विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीत चांगली वाढ होऊ लागली असून यातून ठेकेदारांची थकीत देयके देण्याचे काम पालिकेने सुरु केले होते. आतापर्यंत २०२१ पर्यंतची ठेकेदारांची सातशे ते आठशे कोटींची सर्व देयके पालिकेने दिली आहेत. उत्पन्न वसुलीचे पैसे दायित्वाच्या भारावरच खर्च होऊ लागल्याने पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटींच्या आसपासच रक्कम शिल्लक आहे. यामु‌ळे पालिकेची आर्थिक परिस्थिती अजूनही नाजूकच असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षातील पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची देयके पालिकेने तयार केली असून ही देयके देण्यासाठी पालिकेकडून नियोजन आखले जात आहे. परंतु तिजोरीत पुरेसा निधी शिल्लक नसल्यामुळे ही देयके द्यायची कशी असा प्रश्न पालिकेपुढे उभा राहिला आहे.

हेही वाचा : ठाणे : जीन्स धुलाई कारखान्यांमुळे उल्हास नदीत प्रदूषणाची भीती

उत्पन्न वसुली

विभाग उदीष्ट वसुली
शहर विकास विभाग ५८५ २०४
मालमत्ता कर ७१३ ४२१
पाणी पुरवठा २०५ ३२
अग्निशमन दल १०४ ६४
सार्वजनिक बांधकाम विभाग ४० १८
जाहीरात २२ ५
स्थावर मालमत्ता २१ २०
इतर ४८ २०

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial condition is critical for income thane muncipal carporation tmb 01
First published on: 06-10-2022 at 18:11 IST