डोंबिवली- बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारणाऱ्या भूमाफिया, वास्तुविशारद, मध्यस्थ यांची गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष तपास पथक, ईडीकडून चौकशी सुरू आहे. तरीही या तपास यंत्रणांना न घाबरता काही भूमाफिया बेकायदा बांधण्याचे थांबत नसल्याने पालिका साहाय्यक आयुक्तांनी या भूमाफियांवर बेकायदा बांधकामे तोडण्या बरोबर भूमाफियांवर महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमान्वये फौजदारी (एमआरटीपी) गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे.

ह प्रभागात माफियांना दणका

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
Pune, firing, Firing on youth,
पुणे : शहरात गोळीबारची तिसरी घटना, काडीपेटी न दिल्याने तरुणावर गोळीबार
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

डोंबिवली पश्चिमेत ह प्रभाग हद्दीत मागील पाच ते सहा वर्षात भूमाफियांनी ५०० हून अधिक चाळी, गाळे, बेकायदा इमारतींची बेकायदा बांधकामे केली. या बांधकामांवर पालिकेने वेळोवेळी कारवाया केल्या तरी ती बांधकामे माफियांनी पुन्हा नव्याने उभी केली आहेत. अशा बांधकामांची माहिती घेऊन ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी ती बांधकामे पुन्हा जमीनदोस्त करणे, संबंधित भूमाफियांवर ‘एमआरटीपी’चे विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभरात तीन माफियांवर ह प्रभाग अधिकाऱ्यांनी गु्न्हे दाखल केले.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या सार्वजिनिक बांधकाम विभागात मोठे फेरबदल; वर्षोनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

दर आठवड्याला एक ते दोन बेकायदा इमारती जमीनदोस्त करणे आणि दर आठवड्याला अधिकाधिक एमआरटीपीचे गु्न्हे दाखल करण्याचे नियोजन केले आहे, असे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी सांगितले. सुमारे २५ माफियांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रस्तावित केले आहे, असे ते म्हणाले.

गु्न्हे दाखल

डोंबिवलीत महात्मा फुले रस्त्यावर श्रीधर म्हात्रे चौकात गरीबाचापाडा येथे संदीप दत्तु पाटील या भूमाफियाने नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सात माळ्याची बेकायदा इमारत बांधली. ह प्रभागाचे माजी साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी संदीप पाटील माफियाला बांधकामाची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी त्याकडे पाठ फिरवली. दरम्यानच्या काळात संदीप यांनी सात माळ्याचे बेकायदा बांधकाम पूर्ण केले. या कालावधीत साहाय्यक आयुक्त रोकडे यांनी बेकायदा बांधकाम का जमीनदोस्त केले नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. अलीकडेच ह प्रभागाचा पदभार घेतलेले साहाय्यक आयुक्त गुप्ते यांनी या बांधकामाची पाहणी करुन ते बेकायदा असल्याने संदीप दत्तु पाटीलवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात अधीक्षक अरुण बसवंत यांना आदेश दिले. त्याप्रमाणे विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पश्चिमेतील राहुल नगर मधील पालिका उद्यानाजवळील आशीर्वाद बंगल्या जवळ रतन म्हात्रे या माफियाने दोन वर्षापूर्वी सात माळ्याचे बेकायदा बांधकाम केले. या बांधकामाला ह प्रभागाचे माजी साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप, भागाजी भांगरे यांनी नोटिसा दिल्या होत्या. त्यास न जुमानता रतन यांनी बेकायदा बांधकाम पूर्ण केले. या माफियाच्या विरुध्द अधीक्षक बसवंत यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी एमआरटीपी कायद्याने गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>> ठाणे : म्हसा यात्रेनिमित्त अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल; मुरबाड-कर्जत मार्गावर अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल

पश्चिमेतील कोपर गाव येथील शिवसेना शाखेच्या मागे देवेंद्र बाबू म्हात्रे या माफियाने गेल्या चार महिन्याच्या कालावधीत सात माळ्याचे बेकायदा बांधकाम पूर्ण केले. माजी साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी या बांधकामाला नोटिसा बजावल्या होत्या. तरीही देवेंद्र यांनी बांधकाम पूर्ण केले. हे बांधकाम अनधिकृत असल्याने साहाय्यक आयुक्त गुप्ते यांच्या आदेशावरुन देवेंद्रवर एमआरटीपीचा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आला.

गावदेवी मंदिरजवळील बांधकाम

डोंबिवली पूर्व मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिरा जवळील मागील तीन महिन्याच्या कालावधीत तीन माळ्यापर्यंत उभारण्यात आलेले बेकायदा बांधकाम तोडण्याचे नियोजन फ प्रभाग अधिकारी भरत पाटील यांनी केले आहे. या कारवाईसाठी टिळकनगर पोलीस ठाण्यात पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील यांच्या आदेशावरुन अधीक्षक जयवंत चौधरी यांनी सोमवारी गावदेवी मंदिरा बांधकामाचा भूमाफिया रुपेंद्र कुमार, जमीन मालक केतन दळवी यांच्या विरुध्द एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्यात अर्ज दिला. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या स्वीय साहाय्यकाला या बांधकामात ८०० चौरस फुटाची सदनिका देण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. हे बांधकाम वाचविण्यासाठी काही राजकीय मंडळी जोरदार प्रयत्नशील आहेत.

“डोंबिवली ह प्रभाग हद्दीत सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे नियोजन केले आहे. दर आठवड्याला दोन बेकायदा इमारती आणि पाच एमआरटीपी गुन्हे दाखल करण्याचे प्रस्तावित आहे.”

सुहास गुप्ते : साहाय्यक आयुक्त ह प्रभाग