scorecardresearch

शिळफाटा येथे १३ गोदामांना आग

शिळफाटा येथे सोमवारी दुपारी १३ गोदामांना आग लागल्याची घटना उघडकीस आली. गोदामांमध्ये प्लास्टिक, रबरच्याही वस्तू आहे.

fire in shilphata godown
शिळफाटा येथे १३ गोदामांना आग

ठाणे : शिळफाटा येथे सोमवारी दुपारी १३ गोदामांना आग लागल्याची घटना उघडकीस आली. गोदामांमध्ये प्लास्टिक, रबरच्याही वस्तू आहे. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत अग्निशमन दलाकडून आग विजविण्याचे कार्य सुरू होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

शिळफाटा येथील भट्टी गल्ली परिसरात गोदामांना लाग लागल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विजविण्याचा प्रयत्न केला. परंतु गोदाम एकमेकांवर लागून असल्याने आग वाढत होते. त्यामुळे परिसरातील एकूण १३ गोदामांमध्ये ही आग पसरली. अनेक गोदामांमध्ये प्लास्टिक, रबरच्या वस्तू होत्या. त्यामुळे आग विजविण्यास अडचणी येत होत्या. रात्री उशीरापर्यंत आग विजविण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरू होते.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 20:28 IST

संबंधित बातम्या