कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा येथे एका वाईन शॉप मालकाच्या अंगावर मिरचीपूड फेकून आणि नंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्या जवळील ५ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम, दोघांनी लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, किशोरकुमार काररा हे गोळवली येथील रिजन्सी अनंतंम संकुलात राहतात. किशोरकुमार यांनी उल्हासनगर येथील रहिवासी बिशम मंगवानी यांच्या मालकीचे कल्याण शीळफाटा रस्त्यावरील वाईन शॉप दुकान चालवायला घेतले आहे. ते रोज या दुकानात सकाळी दहा वाजता येऊन रात्री दहा वाजता दुकान बंद करून निघून जातात.

nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून
mumbai, MMRCL, Mumbai Metro Rail Corporation, Colaba Bandra Seepz, Metro 3, Replant Trees 119 , out of 257, Project, environment,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या २५७ पैकी केवळ ११९ झाडांचेच पुनर्रोपण, एमएमआरसीएलचा उच्च न्यायालयातील समितीसमोर प्रस्ताव

किशोरकुमार हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दिवसभरातील झालेल्या उलाढालीची ५ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम आपल्या बॅगेत भरून दुचाकीवरून आपल्या कामगारासह रात्री साडेदहा वाजता गोळवली येथे जात होते. दरम्यान, किशोरकुमार यांची दुचाकी शीळफाटा रस्त्यावरील सोनारपाडा येथील नेकणी पाडा बस थांबा जवळ येताच, दोन जण किशोरकुमार यांच्या दुचाकी समोर अचानक आले. त्यानी किशोरकुमार यांच्या दिशेने मिरची पूड फेकली. आपणास चोरट्यांनी अडवले आहे हे लक्षात येताच किशोरकुमार यांनी दुचाकी वेगाने पळवली. पण ते दोघेही दुचाकीस्वार किशोरकुमार याना पुन्हा आडवे झाले. त्यानंतर त्यांनी किशोरकुमार यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि पळण्याचा प्रयत्न केला तर गोळी झाडण्याची धमकी दिली. याचेवेळी त्यांनी किशोर कुमार यांच्या जवळील पैशांची बॅगही हिसकावली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. किशोरकुमार यांनी चोरट्यांचा पाठलाग केला पण ते अंधाराचा फायदा घेत कल्याणच्या दिशेने पळून गेले.

किशोर कुमार यांनी ही माहिती दुकान मालक मंगवानी यांना दिली. त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.