सागर नरेकर
ठाणे : राज्यातील ४८८ शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या शाळांना बांधकामासाठी राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून भरीव निधी देण्यात आला असून यात ठाणे जिल्ह्यातील पाच शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या काही शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यासाठी राज्याच्या शिक्षण व क्रीडा विभागाने २५० कोटींची तरतूद केली आहे. यात ज्या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करायचे आहे, त्या शाळांसाठी मोठी बांधकामे बांधणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८ शाळा तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन आणि नागरी भागातील अशा ४८८ शाळांना याचा फायदा होणार आहे. यापैकी २९३ प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा ६२ शाळाना अशा एकूण ३५५ शाळांच्या लहान बांधकामासाठी यापूर्वीच ५३ कोटी ९७ लाख १५ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर २६७ प्राथमिक आणि उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ६१ अशा एकूण ३२८ शाळांसाठी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अखेर शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने या शाळांसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीतून शाळांमध्ये आवश्यक मोठे बांधकाम करणे अपेक्षित आहे.
या शाळांचा समावेश
राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला निधी हा राज्यातील २६७ शाळांसाठी आहे. यात ठाणे जिल्ह्यातील पाच शाळांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात येणाऱ्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेची उर्दू शाळा, भिवंडी तालुक्यातील कावड येथील जिल्हा परिषदेची शाळा, मीरा भाईंदर येथील काशी येथील शाळा क्रमांक चार, मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील जिल्हा परिषदेची शाळा आणि उल्हासनगर महापालिकेची कॅम्प तीन भागातील शाळा क्रमांक २५ या पाच शाळांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यातील पाच शाळांना लवकरच आदर्श रूप
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८ शाळा तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन आणि नागरी भागातील अशा ४८८ शाळांना याचा फायदा होणार आहे. यापैकी २९३ प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा ६२ शाळाना अशा एकूण ३५५ शाळांच्या लहान बांधकामासाठी यापूर्वीच ५३ कोटी ९७ लाख १५ हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर २६७ प्राथमिक आणि उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ६१ अशा एकूण ३२८ शाळांसाठी निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अखेर शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने या शाळांसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीतून शाळांमध्ये आवश्यक मोठे बांधकाम करणे अपेक्षित आहे.
शासनाच्या समितीने याबाबत यापूर्वी पाहणी केली होती. उर्दू शाळेला देण्यात आलेल्या भौतिक सुविधा, मैदान, सुरक्षा भिंत, प्रयोगशाळा, बसण्याची उत्तम व्यवस्था या सर्वामुळे आमच्या शाळेची निवड झाली आहे. -विलास जडय़े, शिक्षण विभागप्रमुख, कुळगाव बदलापूर नगरपालिका