डोंबिवली- येथील पश्चिमेतील देवीचापाडा येथील मिलेनियम आर्केड गृहसंकुलातील एका सदनिकाला आज संध्याकाळी अचानक भीषण आग लागली. आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. लोखंडी साहित्य वितळून गेले.गृहसंकुलातील संकुलाला आग लागल्याने रहिवाशांची तातडीने घरातून बाहेर पडणे पसंत केले. संध्याकाळच्या वेळेत वाऱ्याचा वेग असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.
घरातील कुटुंबीय नोकरी आणि बाजारात खरेदीसाठी बाहेर गेले होते. त्यामुळे घरी कोणी नव्हते. तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते. शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली असण्याची प्राथमिक शक्यता जवानांनी व्यक्त केली.या सदनिकेच्या बाजुला किरणा दुकान, त्यांचे गोदाम आहे. आगीची झळ आजुबाजुच्या सदनिकांना बसली.



