ठाणे : केंद्रीय आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थकांनी ठाण्यात फलकबाजी सुरू केली आहे. ‘बघितलं आनंदा… आपल्या एकनाथाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण सोडविला’ असा त्यात मजकूर आहे.

हेही वाचा – उल्हासनगर पालिकेत कोणतीही भरती नाही, बनावट संदेशांमुळे पालिका प्रशासनाला जाहिरात देण्याची वेळ

solapur lok sabha, bjp candidate ram satpute
सोलापुरात गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत भाजप व काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने; तुंबळ घोषणा युद्ध
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

हेही वाचा – ठाण्यात शिंदे गटाकडून शिवसेनेच्या शाखा बळकावण्याचा प्रयत्न? ठाकरे गटाचे थेट पोलिसांना पत्र; म्हणाले “अन्यथा कायदा आणि…”

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शिंदे समर्थकांच्या शिवसेनेमधील वादाने टोक गाठले आहे. बुधवारी ठाणे शहरात शिंदे समर्थकांनी फलकबाजी केली. या फलकावर ‘बघितलं आनंदा… आपल्या एकनाथाने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण सोडविला’ असा मजकूर आहे. या मजकुराशेजारीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. तर एकनाथ शिंदे यांना आकाशातून दैवत धनुष्यबाण देत असल्याचे चित्र आहे. हे फलक शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.