डोंबिवली: विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून वाहतूक नियम काय असतात. त्यांचे पालन कसे करायचे याचे अवलोकन केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने अशाप्रकारे वाहतूक नियमांचा अभ्यास केला तर हाच विद्यार्थी सज्ञान झाल्यावर वाहन सुस्थितीत चालविल. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे मार्गदर्शन कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे साहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लुलकर यांनी सोमवारी येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित मार्गदर्शन करताना परिवहन अधिकारी कल्लुलरकर यांनी सांगितले, शाळेत गेल्यानंतर क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम काय असतात याचा अभ्यास केला पाहिजे. रस्त्यावर लावलेली चिन्हे काय सुचवितात याची माहिती घेतली पाहिजे. शालेय जीवनापासून वाहतूक नियम जाणून घेतले तर हाच विदयार्थी मोठा झाल्यावर योग्य नियमाने वाहन चालविल. कोणी नियम तोडत असेल तर त्याला मार्गदर्शन करील. हीच आता काळाची गरज आहे.

हेही वाचा >>> ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

देशातील वाढत्या अपघातांची संख्या विचारात घेऊन अशाप्रकारची जनजागृती करण्यासाठी असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले पाहिजेत. शाळा, संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक दवणे यांनीही विद्यार्थ्यांना वाहन चालविताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक अमोल पवार, रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, उपाध्यक्ष शेखर जोशी, तोंडवळकर शाळेचे संस्थापक नितीन तोंडवळकर, मुख्याध्यापिका संगीता आचरेकर, गजानन जोशी, संतोष पाटील, वैभव म्हात्रे, अंजिक्य म्हात्रे, रोहित म्हात्रे, प्रकाश राऊळ, निळकंठ पटवर्धन, विजय करंडे उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow the traffic rules from school life appeals transport officer ramesh kallulkar ysh
First published on: 17-01-2023 at 14:15 IST