ठाणे : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह व पोलीस अधिकाऱ्यांसह २८ जणांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात सुमारे पाच कोटी रुपये खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने तपास अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले असून त्यात १० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सामावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना २०१८ मध्ये त्यांनी केतन तन्ना आणि सोनू जालान यांना अटक केली होती. ‘मोक्का’अंतर्गत होणारी कारवाई टाळण्यासाठी तसेच धमकावून सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार केतन तन्ना यांनी ठाणे पोलिसांकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे परमबीर सिंह यांच्यासह २८ जणांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.   विशेष पोलीस पथकात पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांचा सामावेश असून उर्वरित पोलीस कर्मचारी आहेत.