माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या फलकबाजीमुळे चर्चाना उधाण; फलकावर उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र 

शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नौपाडा भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे एक फलक लावले आहे.

naresh mhaske
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के

ठाणे : शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नौपाडा भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे एक फलक लावले आहे. या फलकावर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही छायाचित्र आहे. ठाणे शहरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र फलकावर लावणे टाळल्याचे शहरात दिसून येते. परंतु म्हस्के यांनी फलकावर छायाचित्र लावल्याने शहरात विविध राजकीय चर्चाना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर एक मजकूर प्रसारित केला होता. त्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदावरून राजीनामा दिला होता.

मला पक्षाच्या पदावरून हटविण्यात आले असले तरी मी आजही शिवसैनिक आहे. त्यामुळे मी पक्षप्रमुखांचा फोटो फलकावर लावला आहे.

– नरेश म्हस्के, माजी महापौर

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former mayor naresh mhaske banner discussion photo uddhav thackeray board ysh

Next Story
ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस ; सखल भागांमध्ये पाणी साचले तर, तीन ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी