कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात मंदिराच्या बांधकामावर कारवाई केल्याच्या रागातून माजी नगरसेवकाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली .धक्कादायक बाब म्हणजे प्रभाग क्षेत्र कार्यलयाबाहेरच ही घटना घडली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक आयुक्तांना मारहाण करणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मुकुंद कोट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महानगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईदरम्यान केडीएमसी अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत असून कारवाई दरम्यान सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आता अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून जोर धरू लागली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू आहे. बुधवारी सहाय्यक आयुक्त, अ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या पथकाने  पथक मोहने परिसरात बांधकाम सुरु असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर कारवाई केली.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

कारवाईनंतर सावंत व त्याचे पथक कार्यलयात पोहचले. मात्र त्यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मुकुंद कोटदेखील काहीजणांसोबत कार्यालयात आले आणि वाद घालू लागले. मुकुंद यांनी कार्यलयाबाहेर राजेश सावंत यांना गाठत त्यांना मंदिरावर कारवाईबाबत जाब विचारत शिवीगाळ केला. नंतर सावंत यांनी मारहाणही करण्यात आली. मुकुंद कोट यांनी सावंत यांना कानशीलात लगावली.

याप्रकरणी सावंत यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात कोट आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.