scorecardresearch

ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन

ठाणे येथील शिवाईनगर भागातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

Sudhakar_Chavan
ठाण्यातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे निधन (Photo- Sudhakar Chavan FB)

ठाणे येथील शिवाईनगर भागातील माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुलेखा आणि मुलगा प्रन्मय असा परिवार आहे.

त्यांनी चार वेळा स्थायी समिती आणि एकदा परिवहन समितीचे सभापती पदही भुषविले होते. मागील एक महिन्यापासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. महापालिकेत ते अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून येत होते. १९९२ ते २०१७ असे तब्बल २५ वर्षे म्हणजेच पाच टर्म ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. रविवारी सकाळी ११ वाजता मंत्रजली निवास येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former thane corporator sudhakar chavan passes away rmt

ताज्या बातम्या