scorecardresearch

कल्याणमध्ये माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण; निलंबित शिक्षकाने चारजणांच्या मदतीने केली मारहाण

प्रधान मुंंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कल्याण जनता बँकेचे विश्वस्त, कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते.

ashok pradhan
कल्याणमध्ये माजी कुलगुरू अशोक प्रधान यांना मारहाण; निलंबित शिक्षकाने चारजणांच्या मदतीने केली मारहाण

कल्याण – नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू अशोक प्रधान (८४) यांच्या कल्याण येथील बंगल्यात शिरून पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेतील एका निलंबित शिक्षक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रधान मुंंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कल्याण जनता बँकेचे विश्वस्त, कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. ते कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्त्यावरील प्रधान बंगल्यात अनेक वर्ष राहत आहेत. या मारहाण प्रकरणी अशोक प्रधान यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात निलंबित शिक्षक संजय भागवंत जाधव (५०, रा. शिवम टाॅवर, खडेगोळवली, कल्याण पूर्व), संदेश नामदेव जाधव (३२, रा. सरस्वती काॅलनी, आनंदवाडी, विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व) यांच्यासह दोन अनोळखी पुरूष आणि एक महिलेचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

hasan mushrif nana patole
फसवणूक केल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवूनही मुश्रीफ सत्तेत; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका
zilla parishd palghar
पालघर: खासदारांसाठी नवीन कार्यालयाचा शोध
bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered
भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार
new twist in the molestation case
विनयभंग प्रकरणात नवे वळण, विद्यार्थिनींचे पालक म्हणतात ‘ते’ निर्दोष…

हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्ली पुलाच्या पोहच रस्त्यावर राडारोड्याचे ढीग

कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेचे अशोक प्रधान हे अध्यक्ष होते. या शाळेत संजय जाधव हे शिक्षक होते. जाधव यांना चार वर्षांपुर्वी काही कारणास्तव निलंबित करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी संजय जाधव हे प्रधान यांच्या कर्णिक रस्त्यावरील घरी गेले. ओळख असल्याने प्रधान यांनी त्यांना घरात घेतले. सोबत इतर तीन जण आणि एक महिला होती. नोकरी गेल्याने आपली परिस्थिती खूप हलाखीची झाल्याचे सांगत त्याने निलंबन मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. याबाबत काहीच करू शकत नाही, असे प्रधान यांनी त्याला सांगितले. त्याचा राग येऊन संजय जाधव याच्यासह पाच जणांनी प्रधान यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेश साळवी यांनी दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former vice chancellor ashok pradhan beaten up in kalyan amy

First published on: 20-11-2023 at 22:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×