ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी न्यायालयान कोठडीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही पदाधिकाऱ्यांना मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे. गेल्याकाही दिवसांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते.  ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती.

हेही वाचा >>> ठाकुर्लीतील विकासक, ‘रील स्टार’ सुरेंद्र पाटील तीन जिल्ह्यांतून दीड वर्ष तडीपार

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

या मारहाणी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकाला मारहाण, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विशंत गायकवाड या चौघांना अटक करण्यात आली  होती. ठाणे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी त्यांच्या जामीनअर्जावर निर्णय घेण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.