Four people were cheated by pretending to get a job in Malaysia | Loksatta

ठाणे; मलेशियात नोकरी लावण्याचे अमीष दाखवून चार जणांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल

मलेशिया येथे नोकरीला लावतो असे सांगून आरोपीने चार जणांकडून मे ते जुलै या कालावधीत १ लाख ६० हजार रुपये घेतले होते.

ठाणे; मलेशियात नोकरी लावण्याचे अमीष दाखवून चार जणांची फसवणूक; दोघांविरोधात गुन्हा दाखल
(संग्रहित छायचित्र )

मलेशियामध्ये नोकरी देतो असे सांगून दोन भामट्यांनी चार जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख (६०) आणि मुदस्सीर शेख (३५) यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- ठाणे: लाच घेतल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकारी ताब्यात; गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली होती लाच

फसवणूक झालेले तरुण मुंब्रा भागात राहतात. त्यांची ओळख परवेझ आणि मुदस्सीर यांच्यासोबत झाली होती. मलेशिया येथे नोकरीला लावतो असे सांगून त्यांनी त्यांच्याकडून मे ते जुलै या कालावधीत १ लाख ६० हजार रुपये घेतले होते. अनेक महिने उलटल्यानंतरही त्यांना कुठेही नोकरी देण्यात आली नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 16:30 IST
Next Story
उल्हासनगरः ओमी कलानीवर खंडणीचा गुन्हा; भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाची तक्रार, आरोप खोटा असल्याचा कलानींचा दावा