डोंबिवलीतील रहिवाशांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्याव्दारे रहिवाशांना वाढीव व्याज, गुंतवणुकीचे आमीष दाखवायचे आणि नंतर त्यांची फसवणूक करत, इन्स्टाग्रामवर त्यांची अश्लील छायाचित्र प्रसारीत करून बदनामीची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. अशी कृत्ये करणाऱ्या दोन जणांना विष्णुनगर पोलिसांनी गुजरातमधील सुरत आणि बडोदा येथून अटक केली आहे. अनिल सांबय्या पेदुरी (३१), कुंदन मिश्री शहा (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाण्याजवळील हिमालय आशीष सोसायटीत राहणारे अभिषेक कामत (३१) यांना सुरतमधील आरोपी अनिल पेदुरीने दोन वर्षापूर्वी दोन वेगळ्या मोबाईलवरून संपर्क करून,आकर्षक परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतविण्यास सांगितले. कामत यांनी आरोपीच्या सांगण्याप्रमाणे रोबो ट्रेड माध्यमातून चार लाख ५० हजार रूपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर कामत यांना आकर्षक परतावा तर नाहीच, पण मूळ पैसेही परत मिळत नव्हते. आरोपी अनिल टाळाटाळ करत होता. फसवणूक झाल्याने अभिषेक कामत यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता.

Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Journalist Limesh Kumar Jangam arrested for demanding ransom of five lakhs
चंद्रपूर : पत्रकार लिमेशकुमार जंगमला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
ग्रामविकासाची कहाणी

विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी फियार्दी अभिषेक कामत यांना संपर्क करणाऱ्या आरोपी अनिलचा मोबाईल चालू असल्याची खात्री केली. मोबाईल चालू असल्याने तांत्रिक माहितीच्या आधारे अनिलचे सुरतमधील ठिकाण शोधून काढले. उपनिरीक्षक कुलदीप मोरे, हवालदार के. ए. भामरे, पी. एस. पवार यांचे पथक सुरतला पाठवले. तपास पथकाने सुरतमधील अनिलचे निवास स्थान शोधून काढून त्याला तेथून शिताफीने अटक केली.

दुसऱ्या एका प्रकरणात, डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्ता मारूती मंदिराजवळ राहणाऱ्या एका महिलेचे इन्स्टाग्रामवर बनावट खाते एका इसमाने तयार केले. या खात्याच्या माध्यमातून या महिलेच्या कुटुंबीयांचे मोबाईल क्रमांक मिळवले. संबंधित महिला तिच असल्याची खात्री केली. इन्स्टाग्रामव्दारे तक्रारदार महिलेची अश्लील छायाचित्र प्रसारीत करून बदनामी केली.

गेल्या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर कालावधीत हा प्रकार घडला होता. तेव्हापासून विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भालेराव आरोपीच्या मागावर होते. तांत्रिक माहीतीच्या आधारे बनावट खाते तयार करणारा गुजरातमधील बडोदा येथील रहिवासी असल्याची खात्री पोलिसांना पटली. पोलिसांनी त्याचे बडोदा येथील नारायण नगर, हलोला भागातील निवासस्थान शोधून काढले. या घरात कुंदन मिश्री शहा (२४) राहतो. त्याने हा प्रकार केला आहे, अशी पोलिसांची पक्की खात्री झाली. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांच्या आदेशावरून वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलिसांचे पथक बडोदा येथे गेले. सापळा लावून आरोपी कुंदनला अटक केली.

मागील अनेक वर्षात दोन्ही आरोपींनी किती लोकांची फसवणूक केली आहे. याचा तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांनी दिली.