scorecardresearch

Premium

ठाणे: आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याची फसवणूक

याप्रकरणी चार जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud businessman Ulhasnagar pretending Income Tax Department official
आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याची फसवणूक (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार भामट्यांनी उल्हासनगर येथील व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये सात हजार दिरहम आणि चार हजार ५० रुपयांची रोकड अशी एकूण १ लाख ६५ हजार ५० रुपयांची रक्कम आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
dombivli shilphata road marathi news, shasan aplya dari dombivli marathi news
डोंबिवली : शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद, शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत

उल्हासनगर येथे २८ वर्षीय व्यक्ती राहतात. त्यांचा उल्हासनगरमध्ये कापड व्यवसाय आहे. त्यांना दुबई येथे फिरण्यासाठी जायचे असल्याने बुधवारी मध्यरात्री ते ऑनलाईन कार सेवा पुरविणाऱ्या कारने मुंबई विमानतळाच्या दिशेने जात होते. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ते खारेगाव टोलनाका येथे आले असता, दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांची कार अडविली.

हेही वाचा… बदलापुरात गढूळ पाण्याचा पुरवठा; मुख्य जलकुंभांची सफाई केल्यानंतरही स्वच्छ पाणी नाहीच

आम्ही आयकर विभागाचे अधिकारी असून तुम्ही बेकायदेशीररित्या डाॅलर वापरत असल्याचे त्यांनी व्यापाऱ्याला सांगितले. तसेच त्या भामट्यांनी त्यांची बॅग तपासण्यास सुरूवात केली. व्यापाऱ्याच्या पाकिटामध्ये दिरहम आणि भारतीय चलन होते. दुबईला फिरण्यासाठी जात असल्याने हे चलन असल्याचे त्यांनी भामट्यांना सांगितले. काहीवेळानंतर आणखी दोनजण त्याठिकाणी आले. त्यांनी व्यापाऱ्याची चौकशी करण्यास सुरूवात केली. यातील एकजण व्यापाऱ्याच्या ओळखीचा होता. त्यांनी व्यापाऱ्याकडून पैसे घेतल्यानंतर तिथून पोबारा केला. याप्रकरणी व्यापाऱ्याने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fraud of a businessman from ulhasnagar by pretending to be an income tax department official dvr

First published on: 06-10-2023 at 09:38 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×