वाहन खरेदी करण्यासाठी पहिले अर्धे शुल्क भरा, त्यानंतर वाहन कर्ज मंजुरीसाठी चार लाख रुपयांची प्रक्रिया करण्यास सांगून तीन भामट्यांनी डोंबिवलीतील देवीचापाडा येथील एका व्यावसायिकाची ११ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे.पैसे भरणा केल्यानंतर मोटार वाहन नाहीच, पण भरणा केलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे: सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांचे निधन; हृदयविकारामुळे निधन

प्रथमेश बंडू म्हात्रे (२४, रा. कृष्णकुंज सोसायटी, देवीचापाडा, डोंबिवली पश्चिम) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अक्षय संतोष सुतार, ऋतिक संतोष सुतार (रा. अवचित वाडी, गावनपाडा, बी. बी. फडके मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई), सुमेध शरद सोमजी (रा. सिडको काॅलनी, विल्होळी, लेखानगर, नाशिक) अशी आरोपींची नावे आहेत. सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा >>>मेट्रो १२ ला गती ; सर्वेक्षण अंतिम टप्प्यात

पोलिसांनी सांगितले, प्रथमेश म्हात्रे यांना इर्टिगा हे मोटार वाहन खरेदी करावयाचे होते. त्यांनी युनिक मोटार्स मधील कर्मचारी अक्षय, ऋतिक यांच्याशी संपर्क केला. या दोघांनी प्रथमेश यांना गुगल पे व्दारे आणि काही रक्कम धनादेशाव्दारे सात लाख ५० हजार रुपये रक्कम भरण्यास सांगितली. ही रक्कम भरणा केल्यानंतर आरोपी सुमेध याने तक्रारदार प्रथमेश म्हात्रे यांना वाहन खरेदीसाठी स्वाहणी मोटार्स कंपनीकडून चार लाखाचे कर्ज घेण्यास सांगितले. या सगळ्या कागदोपत्री प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रथमेश मोटाराची प्रतीक्षा करू लागले. वर्ष होत आले तरी आरोपी वाहन देत नाहीत. ते पैसेही परत देण्यास टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक आरोपींनी केली असल्याचे निदर्शनास आल्यावर प्रथमेशने विष्णुनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of a businessman in dombivli on the pretext of buying a vehicle amy
First published on: 05-11-2022 at 13:32 IST