कल्याण मध्ये वित्त पुरवठादाराची औषध विक्रेत्यांकडून फसवणूक | Fraud of financiers by drug dealers in Kalyan amy 95 | Loksatta

कल्याण मध्ये वित्त पुरवठादाराची औषध विक्रेत्यांकडून फसवणूक

कल्याण पूर्वेतील एका वित्त पुरवठादाराची दोन औषध विक्रेत्यांनी ३५ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

कल्याण मध्ये वित्त पुरवठादाराची औषध विक्रेत्यांकडून फसवणूक
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

कल्याण पूर्वेतील एका वित्त पुरवठादाराची दोन औषध विक्रेत्यांनी ३५ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे. आम्ही पैसे परत करत नाहीत काय करायचे ते करा अशी उलट धमकी औषध विक्रेत्यांनी दिल्याने पुरवठादाराने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीकर वैतागले, अरुंद रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी, त्यात पालिकेच्या कचरा वाहू गाड्यांच्या बेफिकीरीची भर

जानेवारी २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सचिन विश्वकर्मा (गरीब नवाज चाळ, श्रीकृष्ण नगर, पत्रीपूल, कल्याण पूर्व), पवनकुमार शुक्ला (रा. चिंचपाडा, कल्याण) अशी आरोपींची नावे आहेत. साबु चेरीयन (४९, रा. साई गणेश विहार, विजयनगर, कल्याण पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत लघुलेखकाला सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

पोलिसांनी सांगितले, गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत आरोपी सचिन विश्वकर्मा याने विश्वकर्मा मेडिकल दुकान, त्यामधील नुतनीकरणाच्या कामासाठी साबु चेरियन यांच्याकडून १८ लाख ३९ हजार रुपये कर्ज रुपाने घेतले होते. पवनकुमार शुक्लाने व्यवसाय करण्यासाठी आपणाकडून १७ लाख २५ हजार रुपये असे एकूण ३५ लाख ६४ हजार रुपये घेतले होते. साबु यांची नॅन्सी फायनान्स नावाची निर्मला निवास, काटेमानिवली, कल्याण पूर्व येथे कंपनी कार्यालय आहे. साबु यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडून कर्जाऊ रक्कम घेऊन नंतर त्या रकमेचा दोघांनी अपहार केला. साबु यांची फसवणूक केली. आणि ते पैसे परत देणार नाहीत अशी भूमिका आरोपींनी घेतल्याने साबु यांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कचऱ्याच्या ढिगावर बसून आंदोलन, अस्वच्छतेविरोधात सामाजिक कार्यकर्त्याने कल्याण पालिकेचा केला निषेध

संबंधित बातम्या

“…म्हणून मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली”; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही”, जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट चर्चेत
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
दिघेंच्या काळातील बिर्जे आजही शिवसेनेतच
कल्याण मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
विश्लेषण : चीनने ‘शून्य कोविड धोरण’ शिथिल केल्यास काय होणार?
नाद कुणाचा करायचा! टायगर शार्कचा व्हिडीओ काढायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, पाण्यातील थरारक Viral Video पाहाच
मधुमेहाच्या रुग्णांनी रोज ‘हे’ पदार्थ खाण्यास सुरुवात करा; रक्तातील साखरेची समस्या कायमची दूर होईल
या चित्रात असलेली चुक तुम्हाला दिसली का? तीक्ष्ण नजर असणाऱ्यांना पटकन येईल ओळखता
पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक