ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक | Fraud of foreign nationals through fake call centers amy 95 | Loksatta

ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

ठाणे तसेच मुलुंड भागात काही ठिकाणी बोगस काॅल सेंटर चालू असून या माध्यमातून परदेशी नागरिकांची ॲानलाईन मार्फत फसवणूक केली जात आहे

ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक
संग्रहित छायाचित्र

ठाणे तसेच मुलुंड भागात काही ठिकाणी बोगस काॅल सेंटर चालू असून या माध्यमातून परदेशी नागरिकांची ॲानलाईन मार्फत फसवणूक केली जात आहे, अशी माहिती पोलीसांना सूत्रांकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी या बोगस काॅल सेंटरवर शनिवारी मध्यरात्री धडक देवून कारवाई केली आणि काॅल सेंटर चालविणाऱ्या १३ पूरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आले.

हेही वाचा >>> डोंबिवली : भोपर गावातील घर जळीतामधील महिला आणि तिच्या मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू

वागळे इस्टेट पोलीस स्टेशन हद्दीतील जयदीप इन्फोसेस बिल्डींग, सेट्रम ऑफिस समोर, मुलुंड चेक नाका, ठाणे येथील आर. एन. सोल्युशन तिसरा माळा रूम नं ३०२ आणि ४ था माळा रूम नं ४२४ या ठिकाणी बोगस कॉल सेंटर चालू आहे. तेथून परदेशी नागरिकांशी ऑनलाईन संपर्क साधुन त्यांची फसवणुक केली जात आहे, अशी बातमी पोलीसांना शुक्रवारी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी या काॅल सेंटरवर धडक देवून कारवाई केली. या कारवाईतसिध्देश सुधीर भाईडकर (३३), सानिया राकेश जैयस्वाल (२६) यांच्यासह १३ पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी अटक केले. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनही ताब्यात घेण्यात आले. यांच्या विरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात ०१ अल्पवयीन मुलगा देखील सहभागी असल्याने त्यास कायदेशीर प्रक्रीयेनंतर पालकांचे ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवली : भोपर गावातील घर जळीतामधील महिला आणि तिच्या मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न ; महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या

ठाणे पोलिसांचे मध्यरात्री कोंबिग ऑपरेशन; १८४ जणांना अटक
ठाणे : महिलांनी कपडे नाही घातले तरी त्या जास्त सुंदर दिसतात… बाबा रामदेव यांचे वादग्रस्त वक्तव्य
“मुख्यमंत्र्यांचा अर्धनग्न फोटो टाकला असता तर…”, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
ठाणे: अंमली पदार्थ आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक
वसाहतीचे ठाणे : सत्यम, शिवम, सुंदरम..

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
Video : भिंतीचा आधार घेत पार्टीतून बाहेर पडली सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी; नेटकरी म्हणाले, “धड चालताही…”