लोकसत्ता, खास प्रतिनिधी कल्याण : हरियाणातून एका गावातून एका महिलेला एका इसमाने मुंबईत नोकरी करण्यासाठी आणले. या महिलेला मुंबईत कुठेही नोकरी मिळाली नाही. मग इसमाने महिलेला कल्याण रेल्वे स्थानकात आणून या महिलेची नजर चुकवून स्वतः मात्र तिला एकटी सोडून पळून गेला. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाला ही माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. या महिलेला कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात तिचे संरक्षण आणि पुढील गावी जाण्याच्या कार्यवाहीसाठी दिले. रेल्वे स्थानकात महिले, मुले, मुली यांच्या संरक्षण आणि साहाय्यासाठी गुन्हे शाखेच्या महिला कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी गस्त घालत होत्या. आणखी वाचा-मेट्रोचे गर्डर वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात, मध्यरात्रीपासून घोडबंदर मार्गावर मोठी कोंडी बुधवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चार ते पाचवर गस्त घालत असताना महिला रेल्वे पोलीस सी. एस. इंगवले, पी. एस. सातव, के. पी. कोरडे यांना पत्रीपुल दिशेने एक महिला फलाटावर एकटीच बसलेली आणि ती रडत असल्याचे दिसले. गस्तीवरील महिला पोलिसांनी या महिलेला विश्वासात घेऊन तू का रडतेस म्हणून विचारणा केली. तिने स्वताचे नाव अंजु बिना रौनक सिंग (३५) असे सांगितले. हरियाणा राज्यातील कैथल गावातील रहिवासी आहे. तिचे आई, वडील निधन पावले आहेत. तिला कोणीही वारस नाही. गावी कामधंदा नसल्याने तिच्याच गावातील एका इसमाने तिला मुंबईत गेल्यावर नोकरी मिळेल. तिथे तुला पैसे मिळतील तेथे आपण राहू, असे सांगून तिला मुंबईत नोकरीसाठी आणले होते. आणखी वाचा-वाढत्या शहरांना पाऊस सोसवेना… : विकासाच्या भस्मासुराचा बळी… अनेक दिवस फिरुनही या महिलेला कुठेही नोकरी मिळाली नाही. तिचे खाण्याचे, राहण्याचे हाल सुरू झाले. नोकरी मिळेल या आशेने गाववाला इसमाने या महिलेला मुंबई परिसरात फिरवत ठेवले. बुधवारी या महिलेला इसमाने कल्याण रेल्वे स्थानकात आणले. अंजू बिना रेल्वे स्थानकात बसली असताना तिची नजर चुकूवन तिचा सहकारी इसम रेल्वे स्थानकातून पळून गेला. या महिलेजवळ पैसे आणि इतर कोणताही आधार नाही. या महिलेला आपण कोणत्या एक्सप्रेसने हरियाणाला जावे हेही माहिती नाही. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक भागत शोध घेतल्यानंतर तिचा सहकारी तिला आढळून आला नाही. सहकाऱ्याने आपणास फसविले. आता आपले काय होणार या विचाराने ही महिला रेल्वे स्थानकात रडत होती. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस पथकाने अंजु बिनाचा ताबा घेतला. तिला आधार देणे, तिचे संरक्षण आणि तिला मूळ गावी पाठविणे या कार्यवाहीसाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले.