ठाणे : ढोला-ताशा, बँजो, ध्वनिवर्धकांवरील दणदणाटी गाण्यांवरील गणेश विसर्जन मिरवणुका टाळून गणरायाला भक्तिभावाने निरोप देण्याचा निर्णय ठाण्यातील काही सार्वजनिक मंडळांनी घेतला आहे. गुलालाऐवजी फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषा आणि टाळांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातील.गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये चित्ररथावरील देखावे साकारण्यात आले आहेत. त्यातून सामाजिक संदेश देण्यात येत आहे.या वर्षी ठाणे शहरात मंडळांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणारे देखावे उभारण्यात येतील. पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी ही मंडळे आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढतील. या मिरवणुकांमध्ये ढोल, ताशे, दणदणाटी गाणी आणि बॅन्जोचा आवाज टाळला जाईल. याशिवाय, गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी टाळून मिरवणुका काढण्यात येतील.

अर्थात, ध्वनिप्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याचे दरवर्षीच्या आकडेवारीतून समोर येते. असे असले तरी काही मंडळांनी पारंपरिक वेशभूषेत मिरवणुका काढल्या जातील. अनेक वर्षांपासून निघाणाऱ्या या मिरवणुकांमधून सामाजिक संदेश दिला जातोच. पण, शिवाय ढोलताशाविना मिरवणुका काढून ध्वनिप्रदूषण टाळले जाईल.स्वातंत्र्यवीर सावरकरनगर येथील सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा ५४ वे वर्ष आहे. हे मंडळ १९९० पासून ढोलताशाविना मिरवणुका काढत आहे. सावरकरनगर ते वर्तक नगर नाका असा मंडळाच्या मिरवणुकीचा मार्ग आहे.

Shiv Sena Dipesh Mhatre billboards banned in Thakurli Cholegaon dombivli
ठाकुर्ली, चोळेगाव हद्दीत शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांचे जाहिरात फलक लावण्यास बंदी; चोळेगाव ग्रामस्थांचा निर्णय
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Villagers set fire to police outpost in West Bengal after 9-year-old girl’s rape-murder
Rape and Murder Case : धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, संतप्त गावकऱ्यांनी पोलीस चौकीच पेटवली!
prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
Action against harassment of women Police will patrol during Navratri festival
पिंपरी : दांडियात महिलांची छेडछाड काढल्यास ‘दंडुका’; नवरात्रोत्सवाच्या काळात पोलीस पायी गस्त घालणार
To support hunger strike Dhangar community member climbed mobile tower
बुलढाणा : तब्बल दहा तास टॉवरवर चढून आंदोलन; उडी घेण्याचा…
thane illegal water connection marathi news
ठाण्यात बेकायदा नळजोडण्यांविरोधात मोहिम, मुंब्रा आणि दिव्यात ९७ बेकायदा नळजोडण्या तोडल्या
High Court refuses to hear PIL seeking ban on use of DJ laser lights in Eid e Milad processions Mumbai news
ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावरील बंदीची मागणी; जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

हेही वाचा >>>यावर्षीही ठाण्यात ढोलाताशांविना विसर्जन मिरवणुकांचा थाट

मिरवणुकीत ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखावा असेल. या मिरवणुकीत १२ तरुण जलतरणपटू, प्रतिनिधीक स्वरूपात पोलीस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील, क्रिकेटपटू, सैनिक, विकासक, मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक समूह यांचा सहभाग असेल. सावकरनगर येथील ओंकारेश्वर सार्वजनिक मंडळाने अशी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.या वर्षी मंडळाच्या मिरवणुकीत वारकऱ्यांच्या दिंडीचे आकर्षण असेल. लहान मुले विविध वेशभूषा करतील. कळवा येथील गुणसागर गणेशोत्सव मित्र मंडळाची वाद्यांच्या गजरात मिरवणूक निघेल. गोकुळ नगर येथील जय भवानी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे फलक तसेच वारकरी हे टाळ, मृदुंग वाजवत मिरवणुकीत सामील होतील.

पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी ही मंडळे आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढतील. ढोल, ताशे, दणदणाटी गाणी व बॅन्जोचा आवाज टाळला जाईल. गुलाल, फटाक्यांची आतषबाजी टाळली जाईल.