कल्याण: येत्या सहा महिन्याच्या कालावधीत कल्याण डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठीचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने तयार केले आहे. मागील तीन वर्षापासून शहरे कचरामुक्त करण्यासाठी विविध उपाय प्रशासनाकडून केले जात आहेत. त्याच उपक्रमाचा हा एक भाग असल्याचे घनकचरा विभागाच्या एका वरिष्ठाने सांगितले.

कचरा निर्मूलनचा महत्वाचा टप्पा असलेल्या प्रतिबंधित प्लास्टिकचा बाजारात वापर होऊ नये यासाठी दुकाने, बाजारात अचानक छापेमारी करुन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले जात आहे. दररोजच्या कचरा संकलनात प्रतिबंधित प्लास्टिक येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शहराच्या ज्या भागात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. तेथील ओला, सुका आणि प्लास्टिक असलेला कचरा रात्रीतून वेगळा करुन सकाळी तो कचरा उचलण्याची प्रक्रिया केली जाते, असे घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

pavana river become most polluted river in india
पवना नदी देशातील सर्वाधिक प्रदूषित; ‘हे’ आहे कारण
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
The State Government has provided funds to the Municipal Corporation for constructing boundary walls along the drains and streams to control the flood situation Pune
ओढ्यांलगत सीमाभिंती बांधण्याचा प्रश्न मार्गी; राज्य सरकारकडून महापालिकेला २०० कोटींचा निधी
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली

हेही वाचा >>> ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

कचरा उचलणारी बहुतांशी वाहने १२ वर्षाहून अधिक काळाची आहेत. या वाहनांची धावसंख्या आयुर्मानामुळे कमी झाली आहे. या वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. कचरा उचलण्यासाठी एकूण २४ मोठी आणि ५३ घंटागाड्या खरेदीचे नियोजन करण्यात आले आहे. १० घंटागाड्या उपलब्ध झाल्या आहेत. जुन्या वाहनांना बरोबर नवीन वाहनांचा अधिक प्रमाणात वापर करुन शहरात कचरा साठून राहणार नाही, अशाप्रकारचे नियोजन केले आहे. अधिक प्रमाणात कचरा वाहू वाहने उपलब्ध झाली तर त्या प्रमाणात कचरा उचलण्याचे प्रमाण वाढणार आहे, असे अधिकारी म्हणाला.

हेही वाचा >>> ठाणे-नगर अंतर कमी होणार, शहापूरजवळ डोळखांब भागात नवा घाट रस्ता होणार

पालिका हद्दीमधील १२२ प्रभागांचे भौगोलिक हद्द, तेथील चाळी, झोपडपट्टयांचा विचार करुन कचरा निर्मूलनाचा आराखडा तयार केला आहे. प्रत्येक प्रभागात किती सफाई कामगार काम करतात. त्यांची भौगोलिक हद्द विस्ताराप्रमाणे काम करण्याची क्षमता किती याचा विचार करुन नियोजन करण्यात आले आहे. सुमारे बावीसशे सफाई कामगार आहेत. अनेक जण नियमित कामगार येत नाहीत. काही आजारी असतात. ७०० कामगार हे ५० वर्षाहून अधिक वयोगटातील आहेत. या कामगारांची क्रयशक्ती कमी झालेली असते. त्याला पर्याय म्हणून झोपडपट्टी, चाळी भागातील कचरा दारांमधून जमा करणे. दाटीवाटीच्या भागात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलनाचे नियोजन केले आहे, असे घनकचरा विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> ‘तलावपाळी परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवा’; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

प्रतिबंध असताना अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कचरा फेकला जातो. पुन्हा गस्ती सेवक (मार्शल) नेमण्यात येणार आहेत. गस्ती सेवकांच्या माध्यमातून कचरा फेकणाऱ्यांवर लक्ष राहते. कचरा फेकणाऱ्यांकडून दंड वसूल करता येतो. सोसायट्यांच्या आवारात यापूर्वी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. ते पुन्हा सुरू केले जाणार आहेत, असे अधिकारी म्हणाला. शहरातील ४० ठिकाणे सुशोभिकरणाचे नियोजन केले आहे. तलाव, मैदाने परिसर स्वच्छ राहिल याची काळजी घेतली जाणार आहे, असे अधिकारी म्हणाला.

“कल्याण-डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठीचे नियोजन केले आहे. वाहन व्यवस्था, मनुष्यबळ, क्युआरचा वापर करुन येत्या सहा महिन्यात कचरा मुक्त केली जातील. लोकांनी या उपक्रमात हिरिरीने सहभागी व्हावे असेही नियोजन आहे.”

अतुल पाटील, उपायुक्त घनकचरा विभाग