scorecardresearch

नालासोपाऱ्यात घरगुती गॅस गळतीमुळे आग, दोन जण जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं

नालासोपारा पूर्वेच्या नक्षत्र वेलफेअर सोसायटी सरस्वती येथील इमारतीमध्ये घरगुती गॅसची गळती होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नालासोपारा पूर्वेकडे शुक्रवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास नक्षत्र वेलफेअर सोसायटीची इमारत आहे. या इमारतीमधील बी विंग रूम नंबर ३११ मध्ये घरगुती गॅसची गळती सुरु होऊन अचानकपणे आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत पती – पत्नी संजय सावंत (५०),शर्मिला सावंत ( ४५) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात नेण्यात आले तेथून त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. गॅस गळतीमुळे बंद खोलीत त्याचा साठा होऊन स्फोट घडला. यात खोलीचा मुख्य दरवाजा, ग्रिल्स खिडकी, तिसऱ्या माळ्यावरुन जमिनीवर पडल्या तसेच स्वयंपाक घरातील खिडकी मोडून पडली असून मोठ्या प्रमाणात सामानाचे नुकसान झाले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gas leak caused fire in nalasopara sgy