ठाणे : गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमामुळे प्रसिद्धी झोतात आलेली नृत्यांगना गौतमी पाटील ही चक्क ठाण्यात मंगळवारी धुलवड साजरी करण्यासाठी येणार आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात ती सहभाग घेणार असून १० हजारहून अधिकजण सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गौतमी पाटील ही यापूर्वी देखील अनेक खासगी कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिली आहे. ठाणे शहरात मंगळवारी ठिकठिकाणी धुळवड साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने विविध खासगी कार्यक्रम ठाण्यात आयोजित केले जातात. ठाण्यात होळी महोत्सवाचे आयोजन ‘गुलाल’ यांच्या वतीने मंगळवारी करण्यात आले असून प्रमोशन प्रार्टनर म्हणून ‘लाव्हा इव्हेंट्स’आहे. ढोकाळी येथील हायलँड मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याची तयारी देखील जवळपास पूर्ण झाली आहे.

नृत्यांगना ‘गौतमी पाटील’ ही या कार्यक्रमात लाईव्ह नृत्य सादरीकरण करणार आहे. तसेच ठाण्याची संस्कृती जपणारे सुप्रसिद्ध ‘रुद्रा’ ढोलताशा पथक देखील यात सहभागी असणार आहे हे विशेष ते ही आपली कला सादर करणार आहेत. ठाण्याच्या सर्वात मोठ्या डीजे लाईनअपने रंगत आणखी वाढवली आहे.

डीजे ओमेन, डीजे स्ले, डीजे साहिल, डीजे अनु, डीजे म्युझिकिड, डीजे निहाल, डीजे जी आणि डीजे वेव्हमन यांचे भन्नाट बीट्स आणि हाय-एनर्जी म्युझिकवर ठाणेकर उत्साहाने थिरकणार आहेत. गौतमी पाटील ही ठाण्यात येत असल्याचे चित्रीकरण देखील तिने समाजमाध्यमावर प्रसारित केले आहे. त्यामध्ये तिने ती ठाण्यात येत असल्याचे सांगितले.