scorecardresearch

ठाणे जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ

एक हजार मुलांमागे ९९८ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे.

girls birth rate Increase in thane
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

स्नेहा जाधव-काकडे, लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीमुळे ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढला आहे. एक हजार मुलांमागे ९९८ मुली एवढा उच्चांक जन्मदरात झाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांपैकी ठाणे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात जास्त आहे. त्यामुळे, ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने ही बाब गौरवाची आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने मुलींच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना यशस्वीपणे अमलात आणल्या आहेत. स्त्रीभ्रूण हत्याविषयी कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली. मुलींना शिक्षणाच्या अधिक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी शासकीय आणि स्थानिकस्तरावर मोठय़ा प्रमाणात जनजागृती केल्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात हा जन्मदर वाढला आहे. यापूर्वी मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे ९२२ इतका होता. परंतु, आता आखलेल्या योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाल्याने हा जन्मदर हजार मुलांमागे ९९८ इतका झाला आहे.

हा कार्यक्रम महिला व बालविकास मंत्रालय, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या वतीने राबविला जातो. हा कार्यक्रम फेब्रुवारी २०१५ पासून मुलींचा जन्मदर कमी असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांत सुरू केलेला आहे. कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने स्त्री-पुरुष जन्मदराचे सव्‍‌र्हेक्षण करण्यात येते. २०१५ -१६ च्या  सर्वेक्षणानुसार हजार पुरुषांमागे राज्यात ९५२ तर ठाणे जिल्हयात ९२२ इतका स्त्री जन्मदर होता मात्र विविध योजना राबवून जनजागृती केल्यामुळे २०१९-२० ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार हजार पुरुषांमागे राज्यात ९६५ तर ठाणे जिल्हयात ९८२ स्त्री जन्मदर वाढल्याचे समोर आला आहे. या सर्वेक्षणानुसार मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत ६० अंकाने मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. मुलींचा जन्मदर पाहता, तो वाढविण्यासाठी शासनस्तरावर विविध उपक्रम व जनजागृती करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 05:14 IST

संबंधित बातम्या