ग्लोबल करोना रुग्णालय बंद

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने करोना रुग्णांच्या उपचारासाठी बांधण्यात आलेले साकेत येथील ग्लोबल करोना रुग्णालय अखेर बंद करण्यात आले आहे.

एकही रुग्ण नसल्याने प्रशासनाचा निर्णय; कर्करोग रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने करोना रुग्णांच्या उपचारासाठी बांधण्यात आलेले साकेत येथील ग्लोबल करोना रुग्णालय अखेर बंद करण्यात आले आहे. मंगळवारी या रुग्णालयात एकही रुग्ण उपचार घेत नव्हता. या रुग्णालयाच्या ठिकाणी आता कर्करुग्णांसाठी रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली ठाणे महापालिकेने सुरू केल्या आहेत.

ठाणे महापालिकेने जून २०२० मध्ये १ हजार ७६ खाटांचे हे रुग्णालय सुरू केले होते. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांनी या रुग्णालयात उपचार घेतले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात दिवसाला केवळ ३० ते ४० करोना रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयातील काही रुग्णांना पार्किंग प्लाझा येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. सोमवारी येथील शेवटच्या रुग्णालादेखील उपचार करून सोडून  देण्यात आले. तसेच हे रुग्णालय बंद करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेत असल्याने येथे आता कोणत्याही स्वरूपाचा नवीन रुग्ण दाखल केला जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

येथील ठेकेदारालादेखील महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. या रुग्णालयाची मुदत ३० नोव्हेंबपर्यंत असल्याने त्यानंतर रुग्णालय पूर्णपणे बंद केले जाणार आहे. या ठिकाणी आता कर्करोग रुग्णालय सुरू करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ग्लोबल करोना रुग्णालय कायमचे बंद केले जाणार असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कमी केले जाणार आहे. त्या निषेधार्थ मंगळवारी काही कर्मचाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Global corona hospital closed ysh

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या