उपजीविकेसाठी तरूणांकडून डोंबिवली, कल्याणमध्ये सोनसाखळी चोरीचा धंदा; १६ लाखांचा ऐवज मानपाडा पोलिसांकडून जप्त

नोकरी, कामधंदा नसल्याने उपजीविकेसाठी भिवंडीतील दोन तरूण कल्याण, डोंबिवली परिसरात सोनसाखळी चोरीचा धंदा मागील अनेक महिन्यांपासून करत होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, पादचाऱ्यांना लक्ष्य करून सोनसाखळी, मंगळसूत्र, गंठण चोरण्याचे प्रकार या परिसरात वाढले होते या दोन्ही आरोपींना मानपाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. रमेश पालीवाल (३४, रा. पद्मा […]

नोकरी, कामधंदा नसल्याने उपजीविकेसाठी भिवंडीतील दोन तरूण कल्याण, डोंबिवली परिसरात सोनसाखळी चोरीचा धंदा मागील अनेक महिन्यांपासून करत होते. ज्येष्ठ नागरिक, महिला, पादचाऱ्यांना लक्ष्य करून सोनसाखळी, मंगळसूत्र, गंठण चोरण्याचे प्रकार या परिसरात वाढले होते या दोन्ही आरोपींना मानपाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १६ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रमेश पालीवाल (३४, रा. पद्मा चाळ, वऱ्हाड देवी, भिवंडी), महेश जठ (रा. लक्ष्मी दर्शन इमारत, कोंबडपाडा, शिवाजी चौक, भिवंडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी मुळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. रमेश पालीवाल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर २९ सोनसाखळी चोरीचे गुन्हे ठाणे, पालघर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कल्याणमधील खडकपाडा, कोळसेवाडी, बाजारपेठ, डोंबिवलीतील मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत त्यांनी गेल्या काही महिन्यात सोनसाखळी चोरीचे नऊ गुन्हे केले आहेत.

चोरीच्या घटनांमध्ये वाढ
मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत वर्दळीच्या ठिकाणी पादचाऱ्यांना लुटणे, महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना वाढल्या होत्या. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, अनिल भिसे, सुनील तारमळे, हवालदार राजेंद्र खिलारे, विजय कोळी , दीपक गडगे, प्रवीण किनरे, महादेव पवार, यल्लप्पा पाटील, प्रशांत वानखेडे, महेंद्र मंझा, अशोक काकोडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, सोमनाथ टिकेकर, भानुदास काटकर, संजु मिसाळ यांची पाच पथके गेल्या महिन्यापासून मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण-शिळफाटा रस्ता, घरडा सर्कल, एमआयडीसी, निवासी विभाग, मानपाडा रस्ता भागात गस्त घालत होते.

पाळत ठेवत आरोपीस अटक
एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होती. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात दोन जण दुचाकीवरून सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे दिसत होते. पोलिसांनी या दुचाकीचा वाहन क्रमांक आणि त्यावरील स्वारांची ओळख पटविली. दोन्ही आरोपी भिवंडीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी भिवंडी भागात पंधरा दिवस पाळत ठेवली. विविध वस्त्यांमध्ये आरोपींचा शोध घेतला. या तपासणीतून रमेश पालीवाल, महेश जठ पोलिसांच्या तावडीत सापडले.
चोरी केलेले दागिने दोघे सोनाराना विकत होते. हे दागिने घरातील आहेत असे ते सांगत होते. नोकरी, कामधंदा नसल्याने उपजीविकेसाठी आपण या चोऱ्या करत होतो, अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.

ऐवजासह दुचाकीही जप्त
पोलिसांनी त्यांच्याकडून १५ लाख २५ हजार रूपये किमतीचे ३०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली होंडा कंपनीची दुचाकी जप्त केली आहे. सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी पाचही पथकांचे कौतुक केले आहे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gold worth rs 16 lakh seized from manpada police dpj

Next Story
कल्याण: प्रेमाची फूस लावून अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवलं, २० दिवसानंतर आरोपी शिक्षकाला अटक
फोटो गॅलरी