scorecardresearch

Premium

ठाण्यात रोटरीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद; लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रियेस हातभार

रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज आणि इंटेललेक्ट बीजवेअर सर्विसेस प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विध्यमानाने दिनांक ७ जुलै २०२३ रोजी इंटेललेक्ट बीजवेअर सर्विसेस प्रायवेट लिमिटेड. महापे या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

blood donation camp Rotary thane
ठाण्यात रोटरीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद; लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रियेस हातभार (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज आणि इंटेललेक्ट बीजवेअर सर्विसेस प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विध्यमानाने दिनांक ७ जुलै २०२३ रोजी इंटेललेक्ट बीजवेअर सर्विसेस प्रायवेट लिमिटेड. महापे या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामधून जमा होणारे रक्त हे श्री सत्य साई संजीवनी रुग्णालय, खारघर नवी मुंबई यांच्या रुग्णालयाला देण्यात येणार आहे.

रुग्णालयामध्ये लहान मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी लागणाऱ्या रक्ताची गरज यामधून भागावली जाणार आहे. असे शिबीर रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजतर्फे नियमितपणे राबविले जाणार आहे. या शिबिरामध्ये एकूण १०३ लोकानी रक्तदान केले. शिबिरासाठी वैद्यकीय मदत डी. वाय पाटील ब्लड बँक यांनी उपलब्ध करून दिली.

9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण
Amrit Kalash Yatra
मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
shortage staff, Nashik Municipal Corporation's partial work contract basis
कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे नाशिक महापालिकेचे अंशत: काम आता कंत्राटी पद्धतीने; ‘या’ सेवांचे खाजगीकरण…
Bai Gangabai Women Hospital
गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात रुग्णावरच औषध खरेदीचा भार, जननी सुरक्षेचा निधी मुरतो कुठे?

हेही वाचा – डोंबिवलीत झाड, विजेचा खांब कोसळल्याने वाहतूक कोंडी

या वेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजच्या अध्यक्षा रेणुका साळवी. खजिनदार संजय गुप्ते, सचिव सुनीत गिरकर, अतुल भागवत, अपर्णा पाटणे, संकेत शेट्टी, सचिन देशपांडे, रश्मी पगार, हंसराज पगार, प्रीती देशपांडे, प्राची नायर उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Good response to blood donation camp organized by rotary in thane ssb

First published on: 08-07-2023 at 17:17 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×