ठाण्यात ३८२ कोटींचा जीएसटी घोटाळा; एकास अटक

वस्तू आणि सेवा कराची बनावट देयके तयार करून होणाऱ्या करचुकवेगिरीला रोखण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या काही महिन्यांपासून पावले उचलली आहेत.

एकास अटक; दोन कंपनी मालकांचा शोध सुरू

ठाणे : वस्तू आणि सेवा कराची बनावट देयके तयार करून कर महसुलाचे नुकसान करणाऱ्यांविरोधात ठाणे केंद्रीय जीएसटी विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमध्ये तीन कंपन्यांचा ३८२ कोटी ६८ लाखांचा वस्तू आणि कर घोटाळा उघडकीस आला आहे. यातील एका कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे, तर दोन कंपन्यांच्या मालकांचा शोध सुरू आहे. 

वस्तू आणि सेवा कराची बनावट देयके तयार करून होणाऱ्या करचुकवेगिरीला रोखण्यासाठी केंद्र शासनाने गेल्या काही महिन्यांपासून पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त राजन चौधरी यांच्या पथकाने करचुकवेगिरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत भाईंदर पश्चिमेतील दोशी मार्र्केंटग कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्यांनी वस्तू किंवा सेवा घेतली नाही आणि ९०.६८ कोटी रुपयांच्या इनपूट टॅक्स के्रडिटचा फसवणूकपूर्ण लाभ घेतला. त्यांनी जीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांची कंपनी एस्बेस्टोस, सुती धागा, शिवणकामाचा धागा यांचा व्यापार करत होती. त्यांनी ५०३.८० कोटी रुपये इतकी मालाची किंमत दाखवून फसवणूक करून इनपुट टॅक्सचे क्रेडिट घेतले होते. मालाचा  प्रत्यक्ष पुरवठा केला नाही आणि  ई-वे बिल भरले नव्हते. केवळ हा कागदी व्यवहार होता. यामुळे  या गुन्ह्याचा सूत्रधार म्हणून त्यांना अटक करण्यात आली  आहे.

याशिवाय आणखी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये भाईंदर परिसरात कार्यरत असलेल्या त्रिमूर्ती जेम्स आणि निकिता ट्र्रेंडग अँड कंपनी यांनी २९२ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटवर फसवणूक करून पैसे मिळविल्याचा प्रकार पथकाच्या निदर्शनास आला असून या प्रकरणी पथकाने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला.

या कंपन्या सक्रिय नव्हत्या आणि त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ठाणे केंद्रीय जीएसटी विभागाकडून सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gst scam of rs 382 crore in thane akp

ताज्या बातम्या