scorecardresearch

Premium

फेरीवाल्याच्या मुलींची नृत्यात राष्ट्रीय स्तरावर झेप

फेरीवाल्याच्या दोन मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे.

hawkers girls
वसई रेल्वे स्थानकातील फेरीवाल्याच्या दोन मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे

वसई रेल्वे स्थानकातील फेरीवाल्याच्या दोन मुलींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. दर्शना पवार (१५) आणि वर्षां पवार (१८) अशी या दोन मुलीची नावे असून राज्य स्तरीय स्पर्धा जिंकल्यानंतर पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे.

दर्शना आणि वर्षां पवार या दोन सख्ख्या बहिणी असून त्यांचे वडील वसई रोड रेल्वे स्थानकात किरकोळ वस्तूंची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरात नृत्याची कसलीच पाश्र्वभूमी नसताना तसेच योग्य प्रशिक्षणाचा अभाव असताना त्यांनी आपली नृत्यकला जोपासली. त्या दोघी नृत्यामध्ये कुशल असून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. गेल्या वर्षी स्पोर्ट्स डान्स फेडरेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत दर्शना व वर्षां यांना प्रथम पारितोषिक मिळाले होते. तर या वर्षी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी एकूण ८०० मुलींमधून या दोघी बहिणींची निवड झाली आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या वतीने दोन्ही बहिणींच्या या कामगिरीची दखल घेताना त्याचा सत्कार केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-04-2017 at 03:29 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×