संतोष सावंत

मुंबईच्या मेट्रो यार्डमधून बांधकामातून पर्यावरणाला धोकादायक असणारा सिमेंटमिश्र मातीचा राडारोडा रविवारी मध्यरात्री रात्री सव्वादोन वाजता पारगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी डंपरमधून टाकताना सिडको अधिका-यांनी रंगेहाथ पकडला. सिडको अधिकारी डंपर चालकाची माहिती घेण्यापूर्वी तेथून डंपर चालक फरार झाले. याबाबत सोमवारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात डंपरच्या क्रमांकासहीत रितसर सिडको अधिका-यांनी तक्रार नोंदविली आहे. पाच दिवसांपूर्वी खारघर वसाहतीमध्ये बांधकामाचा राडारोडा टाकल्यामुळे एका डंपर चालकाला रात्री साडेतीन वाजता सिडको मंडळाच्या पथकाने याचपद्धतीने रंगेहाथ पकडले होते. तसेच रविवारी मध्यरात्री अशाचप्रकारे उरण येथेही सिडको अधिका-यांनी दोन डंपरवर कारवाई केल्याचे सिडको अधिका-यांनी सांगीतले. सिडको मंडळाचे दक्षता विभागाचे प्रमुख शशिकांत महावरकर यांनी सिडको क्षेत्रात राडारोडा टाकणा-यांविरोधात गंभीर पावले उचलले असून यासाठी सिडको मंडळाने अभियंत्यांची भरारी पथके स्थापन केली आहेत.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

हेही वाचा >>> ठाणे : टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार वीजेवरील १२३ बसगाड्या

मुंबईतील टाकाऊ राडारोडा आणि पर्यावरणास हाणी पोचविणारे टाकाऊ वस्तू पनवेल, उरण येथे खाडीकिनारपट्टीला टाकली जात असल्याच्या अनेक दिवसांपासून स्थानिकांकडून तक्रारी येत आहेत. मात्र यावर ठोस कारवाई होत नसल्याने टाकाऊ राडारोडा टाकणा-यांचे फावले होते. यामुळे पनवेल व उरण खाडीक्षेत्रात भराव करणा-यांना फुकटचा भराव मिळतोय मात्र तेथील पर्यावरणाचा यामुळे -हास होत आहे. सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी याबाबत नियंत्रणाचे आदेश दिल्याने सिडकोच्या दक्षता विभागाने कार्यकारी व सहाय्यक अभियंत्यांच्या देखरेखीखाली सिडको व जिल्हा सुरक्षा मंडळाच्या जवानांच्या साह्यानेभरारी पथके पनवेल, उरण आणि विमानतळ बाधित क्षेत्र आणि सिडको वसाहतींमध्ये मध्यरात्रीनंतर तैनात केली. यासाठी स्थानिक पोलीसांना सिडको अधिका-यांना बंदोबस्त देण्याच्या सूचना नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी दिल्या.

हेही वाचा >>> मातृत्वाचा सन्मान हाच आमचा अभिमान ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

सध्या रात्री जागून सिडकोचे अधिकारी याबाबत कारवाई करताना दिसत आहेत. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून सिडको मंडळाच्या गस्तीच्या अधिका-यांना पहिल्यांदा खारघरमध्ये त्यानंतर विमानतळ बाधित क्षेत्राच्या पनवेलमध्ये उरणमध्ये राडारोडा टाकणारे डंपर पुराव्यासह सापडले आहेत. पाच दिवसांपूर्वी रात्रीच्या काळोखात साडेतीन वाजता खारघर वसाहतीमधील सेक्टर ३० येथील ओवे कँम्पकडे जाणा-या रस्त्याकडेला राडारोड्याने भरलेला आयवा डंपर रिकामी करत असताना सिडको अधिका-यांच्या गस्तपथकाने पोलीसांना पकडून दिले. मोहनकुमार भोगटा असे डंपर चालकाचे नाव होते. ओवे कँम्पकडून दर्ग्याकडे जाणा-या वाहतूकीस या राडारोडाच्या भरावामुळे अडथळा होणार असल्याने पोलीसांनी ही कारवाई केली. तसेच रविवारी मध्यरात्री एम.एच. ४६ बी. एम. ३४२० आणि एम. एच. ४६ बी.एम. ७६७२ या दोन डंपरला विमानतळ प्रकल्पाचे काम सूरु असलेल्या ठिकाणी मुंबई येथील मेट्रोच्या बांधकामात निर्माण झालेला धोकादायक असलेला राडारोडा टाकताना पकडले. पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस डंपर चालकाचा शोध घेत आहेत. मात्र मुंबईतून टाकाऊ राडारोडा वाहतूकीस बंदी असणारे डंपर नवी मुंबई आणि पनवेल, उरण मध्ये येतात कसे याची चर्चा सिडको अधिका-यांमध्ये सूरू आहे.