डोंबिवली : करोना महासाथीने मागील दोन वर्षे बंदिस्त केलेल्या समाजाला नववर्ष पालखी सोहळय़ानिमित्त उत्साही वातावरण अनुभवता यावे. टाळेबंदीच्या काळात कल्याण डोंबिवली शहरे बंदिस्त झाली असताना वैद्यकीय, आरोग्य, सामाजिक कार्यातील अनेक करोनासेवक नि:स्पृह भावनेने सामाजिक कार्यात व्यस्त होते. अशा सेवकांचे नववर्षांनिमित्त स्मरण करून त्यांना सामूहिक सलाम करावा, या उद्देशाने यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानने नववर्षांच्या पालखी सोहळय़ानिमित्त आरोग्याचा जागर करण्याचा निर्णय घेतला आहे.
रक्तदान शिबीर, लसीकरण, नवीन आरोग्य केंद्रांची उभारणी, रुग्णालयांमध्ये २४ तास अखंड सेवा देणारे वैद्यकीय विभागातील डॉक्टर, परिचारिका, कक्ष परिचर कर्मचारी, स्मशानभूमीत करोना रुग्णांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेणारे सामाजिक कार्यकर्ते, पार्थिव दहनासाठी अखंड सेवेत असलेले स्मशानभूमीतील पालिका कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, करोना काळात शहर स्वच्छतेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारे सफाई कामगार, या सर्वाचा प्रातिनिधिक सन्मान पालखी सोहळय़ानिमित्त करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी सोमवारी दिली.
करोना रुग्णांची संख्या घटली आहे. ही साथ ओसरत चालली आहे. दोन वर्षे आर्थिकदृष्टय़ा आक्रसलेल्या हातांना काम मिळावे. प्रत्येक घराघरात नववर्ष आनंदाने साजरे व्हावे. ज्या कुटुंबीयांच्या घरातील कर्ते, जिव्हाळय़ाचे सदस्य करोनाने गेले. अशा कुटुंबीयांच्या दु:खात समाजाने सहभागी व्हावे. त्या चटक्यातून दु:खी कुटुंबीयांना बाहेर आणावे, हाही पालखी सोहळा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे, असे दामले यांनी सांगितले. डोंबिवलीत २६ ढोलपथके आहेत. या पथकांनी पालखी सोहळय़ात कसे सहभागी व्हावे याविषयी त्यांना अंतिम निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात ढोल पथकांनी वादन करावे, असा विचार आहे.
पालखी मार्ग
चैत्रपाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता गणेश मंदिरात गणेशाची महापूजा होईल. सकाळी ६.३० वा. गणेशाची पालखी डोंबिवली पश्चिमेतील नाख्ये समूहाच्या पंडित दीन दयाळ रस्त्यावरील मारुती मंदिरात (एव्हरेस्ट हाऊस) दाखल होईल. तेथे गुढी उभारण्यात येईल. मारुती मंदिरापासून पालखी सोहळय़ाला सुरुवात होईल. पंडित दीनदयाळ रस्ता, कोपर पूल, टंडन रस्ता, डॉक्टर राजेंद्र प्रसाद रस्ता, फडके चौक, मानपाडा रस्ता, बाजीप्रभू चौकमार्गे पालखी फडके रस्त्याने गणेश मंदिराकडे येणार आहे. मंदिरात आल्यानंतर करोनासेवकांचा सन्मान केला जाईल. रक्तदान शिबीर, लसीकरण, सायकल, दुचाकी रॅली पालखीत अग्रभागी असेल.

gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर