scorecardresearch

मुंब्र्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पिण्यायोग्य पाणी देण्याची काँग्रेसची मागणी

दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याठिकाणी पिण्यायोग्य पाणी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Congress demands to provide potable water
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ठाणे : मुंब्रा येथील शंकर मंदिर, डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात दिवसातून दोनच तास पाणी पुरवठा केला जात असून त्यातही शनिवारपासून या भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याठिकाणी पिण्यायोग्य पाणी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुंब्रा येथील शंकर मंदिर, डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात दिवसातून दोनच तास पाणी पुरवठा करण्यात येतो. याठिकाणी शनिवारपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याची बाब ठाणे काँगेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी उघडकीस आणली आहे. या दूषित पाण्यामुळे कावीळ, उलट्या, जुलाब यासारखे आजार होण्याची शक्यता असून यामुळे हे पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात फुटलेल्या जलवाहिन्या तसेच दुरुस्ती कामांमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. याच काळात नळातुन अति दूषित पाणी येणार असल्यास ते पिणे टाळावे, औषधांचा वापर करावा व काही दिवस पाणी उकळून व गाळून पियावे,  असे जाहीर आवाहन नागरिकांना करण्यात यावे. तसेच असा पाणी पुरवठा होऊ नये यासाठी योग्य त्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. पाण्याची रंग व चव बदलली असल्यास नमुने घेऊन त्याची चाचणी होणे गरजेचे आहे ही बाब मागील आठवड्यातच आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर देखील महापालिकेकडून मुंब्र्यात दुषित पाणीपुरवठा सुरूच असल्याचा आरोप राहुल पिंगळे यांनी केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 14:56 IST

संबंधित बातम्या