ठाणे : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी या प्रकरणाचे अंतिम आदेश २७ एप्रिलला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश नाईक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप कोणतीही सुनावणी झाली नसल्याने त्यांना अटकेपासून संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

 नाईक यांच्याविरोधात एका महिलेने धमकी आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात, तर लैंगिक अत्याचार प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांत अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नाईक यांनी ठाणे न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी दोन अर्ज केले होते. यातील धमकी प्रकरणातील अर्जावर २७ एप्रिलला अंतिम सुनावणी घेणार असल्याचा निर्णय झाला होता. तर, लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांच्या न्यायालयात झाली होती. न्यायाधीश व्ही. वाय जाधव यांनी हे प्रकरण दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्याकरिता मुख्य न्यायाधीशांकडे पत्र पाठवले आहे. मुख्य न्यायाधीशांनी शुक्रवारी हे प्रकरण एकाच न्यायाधीशांसमोर ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी लैंगिक अत्याचार प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात झाली. जामीन अर्जावरील सुनावणी ही २७ एप्रिलला घेण्याचा निर्णय राजेश गुप्ता यांनी घेतला आहे, अशी माहिती पीडित महिलेचे वकील अजय वरेकर यांनी दिली.

Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
Case of Allegedly Inciting Speech Demand to file case against Nitesh Rane and Geeta Jain
कथित प्रक्षोभक भाषण केल्याचे प्रकरण : नितेश राणे, गीता जैन यांच्यावर गुन्हा दाखल करा