scorecardresearch

वाहतूक कोंडीमुळे कल्याणवासियांचा श्वास कोंडला ; तीन मिनिटांच्या प्रवासासाठी लागतोय तब्बल सव्वा तास

पालिकेत अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. तेही या शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काहीही करू न शकल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाहतूक कोंडीमुळे कल्याणवासियांचा श्वास कोंडला ; तीन मिनिटांच्या प्रवासासाठी लागतोय तब्बल सव्वा तास
वाहतूक कोंडीमुळे कल्याणवासियांचा श्वास कोंडला ; तीन मिनिटांच्या प्रवासासाठी लागतोय सव्वा तास

कल्याण : कल्याण मधील दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवासाठी दुर्गाडी किल्ल्या जवळ वाहतुकीत बदल करण्यात आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कल्याण शहरातील पत्रीपूल, शिवाजी चौक, लाल चौकी, आधारवाडी, सहजानंद चौक परिसर वाहतूक कोंडीत अडकत आहे. अपुरे वाहतूक पोलीस आणि एकाच वेळी दसपटीने वाहने रस्त्यावर येत असल्याने कल्याण मधील वाहतुकीचे नियोजन पूर्ण कोलमडून गेले आहे.गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. कामावरुन घरी परतणारे नोकरदार, देवीदर्शनासाठी फिरणारे भाविक, माल वाहतूकदार या सगळ्या प्रकाराने हैराण आहेत. या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका स्थानिक कल्याणमधील रहिवाशांना बसत आहे.

दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवीचा उत्सव सुरू असल्याने दुर्गाडी कया बंद करण्यात आलेल्या वाहतुकीचा सगळा भार बैलबाजार, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालाचौकी, आधारवाडी भागातील रस्त्यांवर आला आहे. कल्याण शहरातील अंतर्गत वाहतूक या सर्व चौकांना छेदून होत असल्याने मुुख्य रस्त्यावरील वाहने आणि छेद देऊन जाणारी वाहने वाहतूक सेवकाला न जुमानत घुसत असल्याने वाहतूक कोंडीत सर्वाधिक भर पडत आहे.वाहने, चौकांच्या प्रमाणात वाहतूक पोलिसांचे प्रमाण कमी आहे. बहुतांशी वाहतूक पोलीस घोळक्याने दुर्गाडी किल्ला येथे वाहतूक नियोजन करत असल्याने इतर गल्ली बोळातील रस्ते, चौकांमध्ये तैनात वाहतूक सेवकाला कोणीही जुमानत नसल्याने चार दिवसांपासून कोंडीचा त्रास कल्याण मधील नागरिक, शहरा बाहेरील प्रवासी सहन करत आहेत.

हेही वाचा : उल्हास नदीच्या पूररेषेचे फेर सर्वेक्षण होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

दीड तास

पत्रीपुला पासून शिवाजी चौक हे फक्त तीन मिनिटाचे अंतर. या अंतरासाठी बुधवारी संध्याकाळी ६.३० वाजता दीड तास तास लागत होता. पत्रीपुला जवळ संध्याकाळी साडे सहा वाजता असलेला प्रवासी शिवाजी चौकात जाण्यासाठी त्याला सव्वा आठ वाजत होते. अशाच प्रकारे आधारवाडी चौकाकडून लालचौकी मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या अंतरासाठी सव्वा तास लागत होता. जड, अवजड वाहने गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्या मार्गे बंद करण्यात आली आहेत. ही सर्व वाहने शिवाजी चौकातून लालचौकीतून आधारवाडी मार्गे जात आहेत. त्याचवेळी एमएसआरडीसीतर्फे सहजानंद चौक ते तेलवणे रुग्णालय दरम्यान रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. तर दुसरी बाजू काँक्रिटीकरणाची करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन येजा करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.

काळा तलाव रस्ता कोंडीत

आधारवाडी, लालचौकी रस्ता वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेक रिक्षा, इतर वाहन चालक काळा तलाव, बीएसएनएल रस्त्याने सहजानंद चौकात येतात. या १० फुटी स्त्यावरुन येजा करणारी वाहने एकाच वेळी येत असल्याने हा रस्ता कोंडीत अडकत आहे. त्याचवेळी काळी मस्जिदवरुन काळा तलाव चिकणघरकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन येणारी वाहने सहजानंद चौकात अडकून पडत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे पारनाक्यावरुन शिवाजी चौकातून मुरबाडा रस्त्याकडे जाणारा, चिकणघरकडून पारनाक्याकडे जाणारा प्रवासी कोंडीचा फटका बसून जागोजागी अडकत आहे. कल्याण शहरातील वाहतूक कोंडी पाहून ठाणे वाहतूक विभागाने या शहरात इतर शहरांमधील वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा : Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

पालिकेत अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. तेही या शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी काहीही करू न शकल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. शहरांतर्गत दुचाकी स्वार, रिक्षा चालक वाहन कोंडी होत असताना मध्ये वाहने घुसवत असल्याने कोंडी समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक नियोजनासाठी कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र तरडे स्वता रस्त्यावर असतात. पण उपलब्ध मनुष्य बळ कमी असल्याने त्यांचीही नियोजन करताना ओढाताण होत आहे .

हेही वाचा : ठाणे महापालिका मुख्यालयातून शिंदे सेनेची दसरा मेळाव्याची तयारी – माजी नगरसेवकांची पालिकेत पार पडली बैठक

अभिनेत्यांकडून नाराजी

कल्याण मधील ‘लोकसत्ता’च्या आधारवाडी भागातील नवरात्रोत्सव कार्यक्रमासाठी बुधवारी रात्री अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता संतोष जुवेकर आले होते. त्यांनीही कल्याणला यायचे म्हणजे पोटात गोळाच येतो. या शहरात यायचे म्हणजे रस्त्यावर किती वाहन कोंडी असेल याचा प्रथम विचार करावा लागतो. त्यामुळे या शहराची आवड आहे पण वाहतूक कोंडीमुळे नकोसे वाटे, अशी खंत दोन्ही अभियनेत्यांनी बोलून दाखविली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या