scorecardresearch

Premium

कल्याणमधील इतिहासाचे अभ्यासक श्रीराम साठे यांचे निधन

इतिहासाचे अभ्यासक श्रीराम विनायक साठे यांचे सोमवारी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

Sriram Sathe passed away
इतिहासाचे अभ्यासक श्रीराम साठे (फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण- इतिहासाचे अभ्यासक श्रीराम विनायक साठे यांचे सोमवारी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ७८ वर्षाचे होते.

साठे हे मुंबई महानगरपालिकेतून तंत्रज्ञ अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. इतिहास लेखन, वाचन आणि संशोधन हे त्यांचे आवडीचे विषय होते. ते हौशी नाट्य कलाकार होते. मराठी, संस्कृत कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे

आकाशवाणींवरुन साठे यांनी थोरले बाजीराव, माधवराव पेशवे यांच्या जिवनावरील श्रृतिकांचे सादरीकरण केले होते. ‘पेशवे’ या त्यांच्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. मुघल सम्राट हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर होते. शांत, संयमी आणि अभ्यासू अशी साठे यांची ओळख होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: History scholar sriram sathe passed away in kalyan mrj

First published on: 26-09-2023 at 11:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×