ठाणे : मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका भुयारी गटारामध्ये काही दिवस वास्तव्य करायचे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बंद घराची रेकी करून घरफोडी करायची आणि चोरलेल्या पैशांतून विमानाने पुन्हा त्रिपूरा येथील गावी निघून जायचे अशा कार्यपद्धतीने पोलिसांना जेरीस आणलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. राजु मोहम्मद शेख (४१) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला यापूर्वी मुंबई पोलीस आणि गुजरात पोलिसांनी देखील अटक केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घरफोडीच्या प्रकरणात सहभागी असलेला चोरटा वागळे इस्टेट येथे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, उपनिरीक्षक तुषार माने यांच्या पथकाने सापळा रचून राजु शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्याकडे १ लाख १३ हजार १०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा – मुंबईतील निवृत्त ‘आरटीओ’ अधिकाऱ्यासह गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील भामट्याकडून फसवणूक

हेही वाचा – ठाणे: घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि असमतल रस्त्यामुळे अपघातांची भीती

पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने श्रीनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सात घरफोड्या केल्याचे समोर आले. तसेच त्याच्याविरोधात मुंबईतील काही पोलीस ठाण्यांत आणि गुजरात राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. येथील प्रकरणांमध्ये त्याला अटक देखील झाली होती. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतरही त्याने घरफोड्या केल्या. सांताक्रूझ येथील एका भुयारी गटारामध्ये वास्तव्य करायचे. त्यानंतर काही दिवस घरफोडीसाठी बंद घरांची रेकी करायची. तसेच घरफोडी करून चोरलेला मुद्देमाल विकायचा आणि विमानाने त्रिपूरामधील मूळ गावात निघून जायचे अशी त्याच्या गुन्हेगारीची कार्यपद्धती आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home by plane after burglarizing a house a staunch criminal who do burglary in thane was arrested ssb
Show comments