लहानपणापासून आपण अनेक खेळ खेळतो. मैदानी तसेच घरगुती स्वरूपाच्या खेळांचा त्यात समावेश होता. आता मोबाइलने हे दोन्ही प्रकारचे खेळ ठप्प होताना दिसत आहेत. तरीही गाण्यांच्या भेंडय़ा अर्थात अंताक्षरी किंवा पत्ते अजून तग धरून आहेत. निरनिराळे खेळ आपल्यातील गुणांना चालना देण्यासाठी उपयोगी पडतात. झाडांची आवड असणाऱ्यांनी अथवा ती निर्माण करण्यासाठी खाली दिलेली प्रश्नमंजूषा निश्चितच लहानथोर साऱ्यांनाच उपयोगी पडू शकेल.
१. गुलाबी रंगांच्या फुलांची नावे




२. पिवळ्या रंगांच्या फुलांची नावे (वेगवेगळे रंग घेऊन त्या त्या रंगांच्या फुलांची नावे सांगणे)
३. पाच पाकळ्या असलेल्या फुलांची नावे
४. तीन पाकळ्या असलेल्या फुलांची नावे
५. केशरी रंग आणि पाच पाकळ्या असलेल्या फुलाचे नाव
६. सकाळी उमलणाऱ्या फुलांची नावे
७. संध्याकाळी उमलणाऱ्या फुलांची नावे सांगा
८. झाडावर दोन-तीन दिवस टिकणाऱ्या फुलांची नावे सांगा
९. सुगंधी फुलांची नावे सांगा
१०. वाळल्यावरही सुगंध देणाऱ्या फुलांची नावे सांगा
११. पांढरी सुगंधी फुले
१२. रंगीत सुगंधी फुले
१३. सकाळ ते संध्याकाळ या काळात रंग बदलणाऱ्या फुलाचे नाव
१४. संध्याकाळ ते सकाळ या वेळेत रंग बदलणाऱ्या फुलाचे नाव
१५. वेलीवर येणाऱ्या फुलांची नावे
१६. कंदापासून येणारे फुलझाड
१७. फांदीपासून येणारे फुलझाड
१८. बियांपासून येणारे फुलझाड
१९. झुडूप येणारे फुलझाड
२०. वृक्ष असणारे फुलझाड
२१. जमिनीवर सडा पडणाऱ्या फुलांची नावे
२२. गजरा किंवा वेणीसाठी उपयोगी फुलांची नावे
२३. फोटोला हार घालण्यासाठी उपयोगी फुलांचे नाव
२४. देवपूजेसाठी उपयुक्त फुलांची नावे
२५. सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांची नावे
२६. सहज उपलब्ध नसणाऱ्या फुलांची नावे
२७. अनेक रंगांत उपलब्ध असणाऱ्या फुलाचे नाव
२८. भाजी करण्यासाठी उपयुक्त फुलाचे नाव
२९. सजावटीसाठी उपयुक्त फुलांची नावे
३०. रांगोळी काढण्यासाठी उपयुक्त फुलांची नावे
३१. दोन अक्षरी फुलांची नावे
३२. मुलींनी धारण केलेली फुलांची नावे
३३. मुलांनी धारण केलेली फुलांची नावे
३४. अकारान्त फुलांची नावे
३५. आकारान्त फुलांची नावे
३६. इकारान्त फुलांची नावे
३७. उकारान्त फुलांची नावे
३८. वेगवेगळी मुळाक्षरे निवडून त्या त्या अक्षराने सुरुवात होणाऱ्या फुलांची नावे
३९. एकाच फुलाची दोन भाषेतील भिन्न नावे
४०. जोडाक्षर असलेल्या फुलांची नावे
४१. वर तोंड करून अथवा मान करून फुलणारी फुले
४२. खाली मान घालून फुलणारी फुले
४३. पाण्यामध्ये झाड असलेल्या फुलाचे नाव
वरील प्रश्न फक्त फुलांशी संबंधित आहेत. यात जर फळे, भाज्या वेली, ऋतू यांचा समावेश केला तर ही यादी प्रचंड वाढेल. खेळ साधा, पण भन्नाट माहिती.. नाही का?