कल्याण: डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील एका वृत्तपत्र विक्रेत्याने आपल्या वृत्तपत्र विक्रीच्या मंचकासमोर वर्दळीच्या रस्त्यावर पडलेला कल्याण मधील एका महिलेचा पैशाचा बटवा संबंधित महिलेला प्रामाणिकपणे परत केला. या वृत्तपत्र विक्रेत्याचे परिसरातील व्यापाऱी, पादचाऱ्यांनी कौतुक केले. अलीकडे भुऱट्या चोऱीच्या घटना घडल्या आहेत. नजरचुकीने जवळील मोबाईल, पैशाचे पाकीट रस्त्यावर पडले तर ते परत मिळण्याची शाश्वती कमी असते. अशा वातावरणात डोंबिवलीतील एका वृत्तपत्र विक्रेत्याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे.
कल्याण मधील खडकपाडा भागात राहणारी एक महिला शनिवारी संध्याकाळी काही कामा निमित्त डोंबिवलीत आली होती. कामे झाल्यानंतर ती महिला डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकातून पायी रेल्वे स्थानकाकडे चालली होती. यावेळी मदन ठाकरे चौकातील वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांत सकपाळ यांच्या वृत्तपत्र विक्री मंचका समोरुन संध्याकाळी साडे सात वाजता जात असताना महिलेच्या जवळील पैशाचा बटवा (पर्स) मंचकाच्या बाजुच्या पदपथावर पडला. बटवा पडल्याचे महिलेच्या लक्षात आले नाही.
वृत्तपत्र विक्रेते सकपाळ यांनी पैशाचा बटवा उचलून तो कोणाचा आहे का, म्हणून बाजुच्या दुकानातील ग्राहक, पादचारी, व्यापाऱ्यांना विचारणा केली. त्यापैकी कोणीही ताबा घेण्यास तयार झाले नाही. सकपाळ यांनी बटवा उघडून पाहिला. त्यात बँकेची डेबिट, क्रेडीट कार्ड, सात हजार रुपयांची रोख रक्कम होती. सकपाळ यांनी आतील वस्तूंना हात न लावता बटवा तसाच बंद केला. बटवा कोणाचा असेल ती व्यक्ति परत आली तर त्यांना परत करू म्हणून जवळ ठेवला.
संबंधित महिला कल्याण
अशी विचारणा करत ती महिला वृत्तपत्र विक्रेते सकपाळ यांच्या मंचकासमोर आली. तिने बटवा कोणाला सापडला आहे का, अशी विचारणा केली. सकपाळ यांनी तात्काळ त्या महिलेला तिचे नाव, बटव्याचे वर्णन विचारले. त्यांनी क्षणात जवळील बटवा त्या महिलेच्या स्वाधीन केला. याप्रकाराने महिला काही क्षण भावूक झाली.
बटवा मिळण्याची खात्री नसताना एक वृत्तपत्र विक्रेत्याने बटवा प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल या महिलेने आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी सकपाळ यांचे कौतुक केले. असे बटवा परत करण्याचे प्रकार आपण अनेक वेळा केले आहेत. दुसऱ्याच्या कष्टाच्या महेनतीचे पैसे घेणे, वापरण्याचा कोणाला अधिकार नाही, म्हणून अशा वस्तू मिळाल्या की आपण त्या परत करतो, असे सकपाळ म्हणाले.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.